तो मी नव्हेच…NIA च्या समोर अतिरेकी तहव्वुर राणा याचा अजब जबाब
एनआयएच्या कोठडीत असलेल्या अतिरेकी तहव्वुर राणा याने मुंबईवरील 26/11 च्या अतिरेकी हल्ल्यात आपला कोणताही रोल नसल्याचे म्हटले आहे.

मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वुर राणा याला अमेरिकेतून प्रर्त्यापण संधीद्वारे भारतात आणले. तहव्वुर राणा याने 26/11 च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यातील आपला काही संबंध नसल्याचे म्हटले आहे. त्याने डेव्हीड हेडली हाच या हल्ल्या मागचा मास्टरमाईंड असल्याचाही दावाही एनआयएच्या कोठडीत केला आहे. त्याने तपासात सांगितले की या हल्ल्यात आपला कोणताही रोल नसल्याचाही दावा करत सर्व बिल हेडलीवरच फाडले आहे. हेडली देखील अमेरिकेच्या ताब्यात असून त्याला भारताच्या हवाली करण्यासाठी भारताला शिष्टाई वापरावी लागणार आहे.
तहव्वूर राणाला आपल्या कुटुंबाची आता काळजी लागली आहे. त्याला त्याच्या कुटुंबियांशी संवाद करायचा आहे. त्याने आपल्या नातेवाईकांशी बोलण्या संदर्भातील त्यांची कायदेशीर प्रक्रीया काय आहे ? याची देखील विचारणा केली आहे.एनआयएच्या कोठडीत राणा कोणतेही सहकार्य करत नसून त्याला नॉनव्हेज जेवण हवे असले तरी त्याला कोर्टाच्या नियमानुसार जेवण दिले जात आहे.
मुंबईवरील हल्ल्याचे पुरावे दाखवून चौकशी
तहव्वुर राणा याचे आरोग्य सध्या ठीक आहे. त्याची वेळोवेळी मेडिकल टेस्ट केली जात आहे. तपासात तहव्वूर राणा याला 26/11च्या हल्ल्यातील पुरावे दाखवून त्याची चौकशी केली जात आहे.तहव्वूर राणाला याला सेंट्रलाईज्ड वातानुकुलित इमारतीत ठेवले आहे तरीही दिल्लीच्या गर्मीने तो प्रचंड नाराज झाला असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.
भावाशी बोलायचे आहे – राणा
राणाला दिल्लीची गर्मी काही सहन होत नाहीए…त्याला त्याच्या छोट्या भावाशी बोलायचे आहे. राणा चौकशी दरम्यान अधिकाऱ्यांना भारताच्या न्यायिक प्रक्रियेच्या संदर्भात माहिती विचारत आहे. त्याने त्याच्यावर ठेवलेल्या आरोपांची देखील माहीती काढायला सुरुवात केली आहे.
पाकिस्तानसाठी एक इशारा
परराष्ट्र खात्याने गुरुवारी मुंबईवरील हल्ल्यासंदर्भात तहव्वूर राणा आणि पाकिस्तानच्या कनेक्शन संदर्भात मोठे वक्तव्य समोर आले आहे.परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले की पाकिस्तानच्या लाख प्रयत्न केले तरी जागतिक दहशतवादाचे एक केंद्र म्हणून त्याची ओळख पुढे आली आहे. तहव्वुर राणाचे प्रत्यार्पण पाकिस्तानसाठी एक इशारा आहे की त्यांना मुंबईवरील हल्ल्यामागील अन्य आरोपींवर कारवाई करावी लागणार आहे.