AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2021 च्या सुरुवातीला कोरोना लशीची अपेक्षा, मोदींच्या मार्गदर्शनात टीमचे प्रयत्न : डॉ. हर्षवर्धन

कोणाला लस दिली जाईल, कशी दिली जाईल याचा कार्यक्रम ठरला आहे. दहा टप्प्यांची आम्ही तयारी केली आहे, अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली.

2021 च्या सुरुवातीला कोरोना लशीची अपेक्षा, मोदींच्या मार्गदर्शनात टीमचे प्रयत्न : डॉ. हर्षवर्धन
| Updated on: Sep 17, 2020 | 1:29 PM
Share

नवी दिल्ली : पुढील वर्षाच्या सुरुवातीला कोरोनावरील लस उपलब्ध होईल, अशी आशा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्यसभेत व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ समिती काम करत असल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं. (Health Minister Dr Harsh Vardhan in Rajya Sabha on Corona vaccine in India)

“भारत इतर देशांप्रमाणेच प्रयत्न करत आहे. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली एक तज्ज्ञ गट यावर लक्ष ठेवून आहे. आमच्याकडे आगामी काळाचे नियोजन आहे. आम्हाला आशा आहे की पुढील वर्षाच्या सुरुवातीस भारतात कोरोनावरील लस उपलब्ध होईल” असे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्यसभेत सांगितले.

कोणाला लस दिली जाईल, कशी दिली जाईल याचा कार्यक्रम ठरला आहे. दहा टप्प्यांची आम्ही तयारी केली आहे, अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली.

दरम्यान, भारतातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने गुरुवारी 51 लाखांचा टप्पा ओलांडला. भारतात गेल्या 24 तासात 97 हजार 894 नवे कोरोनाबाधित सापडले असून एकूण आकडा 51 लाख 18 हजार 254 वर गेला आहे.

भारतात गेल्या 24 तासात 1 हजार 132 रुग्णांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत 83 हजार 198 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. एकूण 40 लाख 25 हजार 080 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर दहा लाखांपेक्षा अधिक अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण देशात आहेत.

(Health Minister Dr Harsh Vardhan in Rajya Sabha on Corona vaccine in India)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.