या ठिकाणी आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी, भारतात आणा, नेताजींच्या मुलीचे राजकीय पक्षांना भावनिक आवाहन

अर्थतज्ज्ञ असलेल्या अनिता बोस-फाफ यांनी जर्मनीतून एक निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी राजकीय पक्षांना भावनिक साद घातली आहे. त्यांनी लिहिले आहे की- माझ्या वडिलांची स्वतंत्र भारतात जगण्याची तीव्र इच्छा होती. दुर्दैवाने त्यांच्या झालेल्या आकस्मित निधनाने त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. मला वाटते की त्यांच्या अस्थींना तरी किमान भारताच्या जमिनीचा स्पर्श व्हावा.

या ठिकाणी आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी,  भारतात आणा, नेताजींच्या मुलीचे राजकीय पक्षांना भावनिक आवाहन
नेताजींच्या मुलीचे भावनिक आवाहन Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 2:55 PM

नवी दिल्ली – आझाद हिंद सेनेचे संस्थापक आणि प्रेरणा देणारे स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhashchanda Bose)यांच्या अस्थी सध्या टोकियोतील (Tokyo)रेनकोजी मंदिरात आहेत. त्या अस्थी तरी किमान भारतात आणाव्यात, असे आवाहन नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस यांनी देशआतील राजकीय पक्षांना केले आहे. नवी दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे अनावरण करणार आहेत. इंडिया गेटवर नेताजींची ही २८ फूट उंच प्रतिमा निर्माण (bring in India) करण्यात आलेली आहे. नेताजी यांची कन्या अनिता यांनी या प्रतिमेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले आहेत.

अनित बोस-फाप यांचे भावनिक आवाहन

अर्थतज्ज्ञ असलेल्या अनिता बोस-फाफ यांनी जर्मनीतून एक निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी राजकीय पक्षांना भावनिक साद घातली आहे. त्यांनी लिहिले आहे की- माझ्या वडिलांची स्वतंत्र भारतात जगण्याची तीव्र इच्छा होती. दुर्दैवाने त्यांच्या झालेल्या आकस्मित निधनाने त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. मला वाटते की त्यांच्या अस्थींना तरी किमान भारताच्या जमिनीचा स्पर्श व्हावा. यासाठी भारतातील राजकीय पक्ष आणि भारतीय नागरिकांना यासाठी राजकीय कारणाविना एकत्र येण्याचे मी आवाहन करेत.

अस्थी भारतात आणण्यासाठी पंतप्रधानांची घेणार भेट

आज नवी दिल्लीत इंदिया गेटवर होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही असेही अनित बोस यांनी स्पष्ट केले आहे. मात्र रेनकोजी मंदिरात असलेल्या वडिलांच्या अस्थी भारतात आणण्यासाठी असलेल्या अटी आणि प्रक्रियेबाबत चर्चा करण्यासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. नेताजी यांच्या अस्थी टोकियोतील रेनकोजी मंदिरात ठेवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केलेला आहे.

हे सुद्धा वाचा

आपल्या वडिलांची नेताजी सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा नवी दिल्लीत स्थापन करण्यात येत आहे, याचा आनंद आहे, त्यांना गौरवाचे स्थान मिळत आहे, असे समाधानही त्यांनी व्यक्त केले आहे.

नेताजींच्या प्रतिमेचे सुभाषचंद्र बोस यांच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल विस्टाचा पुनर्विकास योजनेंतर्गत राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटपर्यंतच्या कर्तव्य पथाचे उद्घाटन आज संध्याकाळी करणार आहेत. यात राज्यांप्रमाणे असलेले फूड स्टॉल्स, लाल ग्रेनाइटवर असलेला पायी चालणाऱ्यांसाठीचा रस्ता यांचा समावेश आहे. तसेच इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचेही अनावरण करण्यात येणार आहे.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.