मोठे संकट येणार ? पर्वत झाले बर्फावाचून उघडे बोडके, ग्लोबल वार्मिंगचा असाही फटका
बर्फवृष्टी न झाल्याने ग्लेशियर वेगाने वितळत आहेत. एवढेच नव्हे तर ग्लेशियर तुटण्याचा वेग देखील वाढला आहे. येथे कडाक्याची थंडी असली तर पर्वतावरील पांढरी बर्फाची चादर गायब झाली आहे.

बदलत्या हवामानाचा परिणाम आता हिमालयाच्या पर्वतावंर दिसत आहे. जे पर्वत वर्षभर बर्फाच्या पांढऱ्या चादरीने झाकलेले असायचे ते आता पूर्णपणे काळे दिसत आहेत. हवामानाच्या या बदलत्या परिस्थिती सततच वाढत चाललेले तापमान जबाबदार मानले जात आहे. जर असाच प्रघात सुरु राहिला तर येणाऱ्या काळात खूपकाही बदलून जाणार आहे. हायर हिमालयात बराच काळ बर्फवृष्टी झालेली नाही. त्यामुळे १५ हजार अधिक फूट उंचावरील कड्यांवर देखील बर्फ नसल्याने तो उघडे बोडके आणि काळे दिसत आहेत.
10 वर्षात 3 डिग्री वाढले तापमान –
बर्फवृष्टी न झाल्याने ग्लेशियर वेगाने वितळत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या तुटण्याचा वेग देखील वाढला आहे. या भागात जरी कडाक्याची थंडी असली तरीही पर्वतांवर बर्फ दिसणे दुर्मिळ झाले आहे. हिमालय हा जगातील सर्वात उंच पर्वत श्रेणीत येतो. एवढेच नव्हे तर तो संवेदनशील देखील म्हटला जातो. तरी येथे गेल्या दहा वर्षात 3 डिग्रीने तापमान वाढले आहे. वाढत्या पाऱ्याचा हा वेग जगात सर्वाधिक हिमालय क्षेत्रात आहे.
येणारा काळ घातक ?
ज्येष्ठ संशोधक डॉ. पी.सी. तिवारी यांनी सांगितले की ज्या वेगाने हिमालयाच्या रेंजमध्ये पर्यावरण बदलत आहे. त्याचे परिणाम येत्या काळात खूपच घातक होऊ शकतात. ग्लोबल वार्मिंगमुळे दर वर्षी हिमालयाच्या पर्वत श्रृंखला १० मिलीमीटर वेगाने वरती जात आहेत. एवढेच नाही तर हिमालय जगातील जास्त लोकसंख्येची घनता असलेल्या विभागही आहे. त्यामुळे या भागातील कोट्यवधी लोकांना अडचणी येऊ शकतात. हिमालयाच्या रेंजमध्ये प्रचंड निर्माण कार्य सुरु असल्याने देखील हा बदल झाला आहे. गरजेपेक्षा जास्त मनुष्याच्या हस्तक्षेपाने पर्यावरण प्रभावी झाले आहे.
दरवर्षी गंगोत्री ग्लेशियर १५ मीटर मागे सरकतेय
गंगोत्री ग्लेशियर दरवर्षी १५ मीटर मागे सरकत चालले आहे. केंद्र सरकारात पर्यावरण मंत्रालयाचे सचिव राहिलेले हेम पांडे यांच्या मते हिमालयाचे सर्वाधिक शोषण होत आहे.अतिप्रमाणात बांधकामे केल्याने हिमालयाचा नकाशाच बदलला आहे. हिमालयात गेल्या २० वर्षात १५ टक्के पावसाची घट झाली आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई झाली आहे. गेल्या १० वर्षात मध्य हिमालयातील दोनशेहून अधिक जलस्रोत संपूर्णपणे सुखले आहेत. त्यामुळे पर्यावरणाच्यादृष्टीने काही प्लानिंग झाली नाही तर शेती, रोजगारासह मनुष्याच्या आरोग्याची याची किंमत मोजावी लागेल.
