RSS: शाळा, कॉलेजांत आता हिंदुत्वाचे धडे?, रायपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत काय ठरलं?

भारताची घोषणा हिंदू राष्ट्र अशी होणार का, या प्रश्नाचे उत्तरही मनमोहन वैद्य यांनी दिले. त्यांनी सांगितले की राष्ट्र याचा अर्थ समाज असा असतो. तर इथला समाज हा हिंदूच असल्याचे त्यांनी सांगितले. अनेकतेत एकता पाहणे हाच भारताचा धर्म असल्याचे त्यांनी सांगितले. धर्माचा अर्थ त्यामुळे इथे रिलिजन असा होत नसल्याचे वैद्य म्हणाले.

RSS: शाळा, कॉलेजांत आता हिंदुत्वाचे धडे?, रायपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत काय ठरलं?
संघाची दिशा काय?Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 7:53 PM

रायपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS)अखिल भारतीय समन्वयाच्या बैठकीत, सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagvat)यांनी देशातील संघ परिवारातील महत्त्वाच्या संघटनांशी चर्चा केली. येत्या काळात देशात काही सकारात्मक बदलांवर काम होण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. यात देशातील शाळा आणि कॉलेजांत हिंदुत्वाचा कोर्स (hindutva course)शिकवण्यात यावा, या बाबीचाही समावेश आहे.

बैठकीनंतर संघाचे सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी सांगितले आहे की, या बैठकीत हे ठरवण्यात आले आहे की, देशाच्या विद्यापीठांत हिंदुत्वाचे शिक्षण द्यायला हवे. जर अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये हिंदुत्वाचे शिक्षण घेता येत असेल तर आपल्या देशातही हे शिक्षण घेता यायला हवे, असे वैद्य म्हणाले. यासह जीडीपीच्या ऐवजी भारतीय मानक इंडेक्स तयार करण्याचाबाबतही या बैठकीत विचार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

हिंदू राष्ट्राबाबतही केले भाष्य

भारताची घोषणा हिंदू राष्ट्र अशी होणार का, या प्रश्नाचे उत्तरही मनमोहन वैद्य यांनी दिले. त्यांनी सांगितले की राष्ट्र याचा अर्थ समाज असा असतो. तर इथला समाज हा हिंदूच असल्याचे त्यांनी सांगितले. अनेकतेत एकता पाहणे हाच भारताचा धर्म असल्याचे त्यांनी सांगितले. धर्माचा अर्थ त्यामुळे इथे रिलिजन असा होत नसल्याचे वैद्य म्हणाले. देशात विविधतेत भेद मानण्यात येत नाही. परकीयांना शत्रू समजत नाही. त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जायचे असल्याचे त्यांनी सांगितले. देशात हिंदू-मुसमानांचत वाद होतल, पण ते मरणार नाहीत. सामंजस्यता निर्माण होईल, तेच हिंदुत्व असेल. त्याची घोषणा करण्याची गरज नाही, ते हिंदू राष्ट्र आहेच.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसवरही केली टीका

या बैठकीत सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रा आणि सोशल मीडियावर संघाच्या विरोधात टा नेते, कण्यात आलेल्या एका पोस्टवरही तिखट प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांच्या बापजाद्यांनी नेहमीचा संघाचा तिरस्कार केला आहे. मात्र तरीही संघ वाढत राहिला. संघ का काढला, कारण राष्ट्रासाठी सत्याच्या सिद्धांतावर संघ काम करीत राहिला.

देशातील 36 संघटनांचा सहभाग

तीन दिवस रायपुरात संघाची समन्वयाची बैठक पार पडली. यात संघ विचारांवर चालणाऱ्या 36 संघटनांचे 250 प्रमुख व्यक्ती, पदाधिकारी उपस्थित होते. यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हेही उपस्थित होते. तीन दिस चाललेल्या या बैठकीनंतर सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी या बैठकीबाबत माहिती दिली.

आगामी काळात ही असणार संघाची दिशा

  1. स्थानिक वस्तूंना मागणी, प्रसिद्धी वाढवण्यासाठी प्रयत्न करणार, ब्रँडेच वस्तुंमुळे स्थानिक कामागारांच्या उत्पादानाचे नुकसान होते आहे.
  2. जीडीपीच्या एवजी भारतीय मानक इंडेक्स तयार करण्यावर विचार
  3. ऑग्रेनिक फार्मिंग, शेतकरी, मजूर, व्यापारी यांना एकत्र नेण्याचा प्रयत्न करणार. शेती करणाऱ्यांचे शिक्षण नसते, पदवीधर शेती करीत नाहीत. त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर काम करणार
  4. भारतीय न्यायालयात भारतीय भाषांतून कामकाज व्हावे यासाठी आग्रही राहणार. न्यायाधीश आणि वकील काय बोलतात, हे बऱ्याचदा कळत नाही
  5. आदिवासी जनजातींचे स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न करणार
Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.