Mohan Bhagwat : संघाने आधी सोशल मीडियावरील डीपी बदलला; आता प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे सरसंघचालकांकडून आवाहन

RSS आरएसएसने आपल्या प्रत्येक सोशल मीडिया अकाऊंटचा डीपी बदलून त्याजागी तिरंगा लावला आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येक घरावर तिरंगा फडकवा असा संदेश सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला आहे.

Mohan Bhagwat : संघाने आधी सोशल मीडियावरील डीपी बदलला; आता प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे सरसंघचालकांकडून आवाहन
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 10:47 AM

नवी दिल्ली : देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले आहेत. देशाचा स्वातंत्र्यदिन (independence day) अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भाजपाच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Triranga) अभियान देशपातळीवर राबवले जात आहे. या अभियानाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान मोदींसह (pm modi) भाजपाच्या जवळपास सर्वच नेत्यांनी तसेच विरोधकांनी देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटचा डीपी बदलून तिरंगा ठेवला आहे. त्याचप्रमाणे देशातील कोट्यवधी नागरिकांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या सोशल मीडिया अकाऊंटचा डीपी बदलला आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवर भगवा ध्वजच ठेवण्यात आला होता.यावरून विरोधकांनी संघावर जोरदार टीका केली. त्यानंतर आता आरएसएसने आपल्या सर्व सोशल मीडिया अकाउंटचा डीपी बदलून तिरंगा ठेवला आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे.

मोहन भागवत यांचा संदेश

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटच्या माध्यमातून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये मोहन भागवत हे झेंडावंदन करतान दिसत आहेत.’स्वाधीनता का अमृत महोत्सव मनाएँ. हर घर तिरंगा फहराएँ.राष्ट्रीय स्वाभिमान जगाएँ’. असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उत्साहात साजरा करूया, प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून राष्ट्रीय स्वाभिमान जागृत करू अशा अशयाचं ट्विट आरएसएसच्या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर आरएसएसच्या प्रत्येक सोशल मीडिया अकाऊंटचा डीपी बदलून त्या ठिकाणी तिंरगा लावण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

विरोधकांची टीका

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने देशपातळीवर ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात आले आहे. मात्र भाजपाच्या वतीने हे अभियान राबवून देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवर भगवा ध्वजच ठेवण्यात आला होता.यावरून विरोधकांनी संघावर जोरदार टीका केली होती. आता आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या प्रोफाईलचा फोटो बदलून संघाने विरोधकांना उत्तर दिल्याचे बोलले जात आहे.एवढंच नव्हे तर प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून राष्ट्रीय स्वाभिमान जागृत करण्याचा संदेश मोहन भागवत यांनी दिला आहे.

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.