होळीच्या रंगानीच काय तर रोमॅण्टीक गाण्यानेही देवता होते नाराज, १२५ गावात रंगाचा सण निषिद्धच
३,७०० मीटर उंचीच्या टेकडीवर वसलेल्या चिपला केदार देवतेच्या भक्तांना देवतेच्या पूजेदरम्यान आणि यात्रेदरम्यान रंगीबेरंगी कपडे घालण्याची परवानगी नाही. पांढरी कपडे घालूनच पुजा करावी लागते....

देशाच्या कानाकोपऱ्यात होळीचा उत्साह सुरु असतान उत्तराखंडातील १२५ गावात मात्र होळी खेळणे निषिद्ध आहे. या गावातील लोक रंगांना स्पर्श करताना देखील घाबरतात.या लोकांनी होळी का साजरी केली जात नाही यामागचे सांगतलेले कारण मोठे चमत्कारीक आहे. लोकांचे म्हणणे असे आहे की होळी खेळल्याने त्यांच्या गावावर नैसर्गिक संकट येऊ शकते. एवढेच काय काही गावात तर पूजापाठ करताना देखील रंगीत कपडे घालायला देखील भीती वाटत आहे.
उत्तराखंड येथील कुमाऊ क्षेत्रातील बहुसंख्य भागात जेथे देशातील अन्य क्षेत्रासारखी होळी खेळली जात नाही. उत्तरेकडील या डोंगराळ भागातील १२५ हून अधिक गावात लोक आपल्या कुलदेवतांच्या प्रकोपाने रंगाच्या या सणापासून चार हात दूरच रहाणे पसंद करीत आहेत. पिथौरागढ जिल्ह्यातील तल्ला डारमा, तल्ला जोहार क्षेत्र आणि बागेश्वर जिल्ह्यातील मल्ला दानपूर क्षेत्रातील १२५ हून अधिक गावातील लोक होळीचा सण साजरा करीत नाहीत. कारण त्यांची कुलदेवता रंगाने खेळल्यावर नाराज होते अशी त्यांची मान्यता असल्याचे मुनस्यारी भागात राहणारे पुराणिक पांड्ये यांनी म्हटले आहे.
म्हणून होळी साजरी केली जात नाही
होळीचा सण हा एक सनातनी परंपरेचा हिंदू सण असून तो माघ महिन्याच्या पहिल्या रविवार पासून सुरु होत चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या प्रतिपदापर्यंत चालतो. हा हिंदू सनातनी सण १४ व्या शतकात चंपावतच्या चांद राजाने कुमाऊं प्रदेशात आणला. राजांनी ब्राह्मण पुरोहितांच्या माध्यमातून याची सुरुवात केली आणि म्हणूनच जिथे जिथे त्या पुरोहितांचा प्रभाव होता तिथे तिथे हा उत्सव पसरला. ज्या भागात सनातनी परंपरा पोहचल्याच नाहीत तेथे होळी साजरी केली जात नाही असे पूर्व कुमाऊं प्रदेशाचे सांस्कृतिक इतिहासकार पदम दत्त पंत यांनी सांगितले आहेत.




दीडशे वर्षांपासून होळीवर बंदी
सामा विभागातील एक डझन गावात अशी मान्यता आहे की जर गावकरी रंगात खेळले तर त्यांच्यावर कुलदेवता नाराज होते आणि नैसर्गिक संकटाची मालिका सरु होते. कुमाऊ क्षेत्रच नव्हे तर गढवाल जिल्ह्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील तीन गावात क्वीली, खुरझांग आणि अन्य एका गावातील गावकऱ्यांनी कुलदेवी त्रिपुरा सुंदरीने या गावात नैसर्गिक संकटाची मालिका सुरु केल्यानंतर गेल्या दीडशे वर्षांत या गावात कधी होळी खेळलीच गेली नाही.
गुजरात आणि झारखंडच्या या भागातही बंदी
केवळ उत्तराखंडच नव्हे तर गुजरातच्या बनासकांठा आणि झारखंडच्या दुर्गापूर क्षेत्रातील अनेक आदिवासी गावात देखील कुलदेवतेचा शाप आणि क्रोधाने होळी खेळली जात नाही. चिपला केदार देवतेवर विश्वास ठेवणाऱ्या अनेक गावात होळी खेळली जात नाही. चिपला केदार केवळ होळीच्या रंगानीच नव्हे तर होळीच्या रोमँटीक गाण्याने देखील नाराज होतात.
केवळ पांढरे कपडे घालतात
३,७०० मीटर उंचीच्या टेकडीवर वसलेल्या चिपला केदार देवतेच्या भक्तांना देवतेच्या पूजेदरम्यान आणि यात्रेदरम्यान रंगीबेरंगी कपडे घालण्याची परवानगी नाही. पूजेदरम्यान, पुजाऱ्यांसह सर्व भक्त केवळ पांढरे कपडे घालतात. कुलदेवतांच्या क्रोधामुळे या भागात अजूनही होळीवर बंदी आहे, परंतू दिवाळी आणि दसरा यासारख्या हिंदू सनातनी सणांना आता या दुर्गम भागात स्थान मिळू लागले आहे. या गावांमध्ये रामलीला रंगू लागल्या आहेत आणि दिवाळीही आता साजरी केली जात आहे असे एका पुजाऱ्याने सांगितले.