AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीच्या संवेदनशील भागात सुरक्षा वाढवा, इंटरनेट सेवा बंद करा, अमित शाहांच्या अधिकाऱ्यांना सूचना

गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आपल्या निवासस्थानी आपत्कालीक बैठक बोलावून राजधानीमध्ये अतिरिक्त सुरक्षा दलांना तैनात करण्याच्या सूचना केल्या.

दिल्लीच्या संवेदनशील भागात सुरक्षा वाढवा, इंटरनेट सेवा बंद करा, अमित शाहांच्या अधिकाऱ्यांना सूचना
भाजप खासदार नारायण राणे यांच्या कणकवली येथील लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी कोकणात आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन जोरदार राजकीय फटकेबाजी केली.
| Updated on: Jan 27, 2021 | 8:59 AM
Share

नवी दिल्ली : दिल्लीत (Delhi) प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मंगळवारी (Republic Day) शेतकऱ्यांच्या (Amit Shah Took Emergency Meeting) हिंसक प्रदर्शन आणि लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकावल्याच्या घटनेनंतर गृह मंत्रालयाने या घटनेला अत्यंत गंभारपणे घेतलं. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आपल्या निवासस्थानी आपत्कालीक बैठक बोलावून राजधानीमध्ये अतिरिक्त सुरक्षा दलांना तैनात करण्याच्या सूचना केल्या. सर्व वारसा आणि संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा दलाला तैनात करण्यात येईल. त्याशिवाय, हिसेंसाठी जबाबदार असणाऱ्या लोकांची ओळख करुन त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहेत (Amit Shah Took Emergency Meeting).

दिल्लीत मंगळवारी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीने घेतलेलं हिंसक रूप आणि अनेक ठिकाणांवर पोलिसांसोबत हिंसेच्या घटनेला गंभारतेने घेत गृहमंत्री अमित शाह यांनी मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. बैठकीत राजधानीमध्ये सुरक्षा व्यवस्थेची चाचपणी करण्यात आली आहे. गुप्त संस्थांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सूचना दिल्या.

सूत्रांच्या माहितीनुसार, शेतकरी आंदोलनाअंतर्गत प्रतिबंधित संस्थेकडून हिंसेला प्रोत्साहन देण्याचे इनपुट गुप्त संस्थांना मिळालं होतं. गुप्त संस्थेने पुढेही हिंसेची शक्यता नाकारता येत नाही. या बैठकीत गृह सचिव आणि आईबीचे डायरेक्टर उपस्थित होते.

संवेदनशील स्थानांवर अतिरिक्त पॅरामिल्रिटी फोर्सेस तैनात

सूत्रांच्या माहितीनुसार, राजधानीतील सर्व संवेदनशील स्थानांवर अतिरिक्त पॅरामिल्रिटी फोर्सेस तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरुन, पुढे कुठल्याही प्रकारच्या हिंसक घटना होऊ नये. हिंसक प्रदर्शनात सहभागी लोकांची ओळख पटवून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. गृह मंत्रालयाने या बैठकीत दिल्ली पोलिसांना राजधानीमध्ये हिंसक प्रदर्शनामागे ज्यांचा हात होता त्यांची ओळख पटवण्याचे आदेश दिला आहेत. त्यामुळे सध्या त्या सर्व ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची चाचणी केली जात आहे, जिथे हे आंदोलन झालं होतं.

काही ठिकाणी इंटरनेट सुविधा बंद करण्याच्या सूचना

गृह मंत्रालयाने दिल्लीच्या अनेक भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी आंदोलन झालेल्या स्थानावर आज रात्री 12 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहे. सिंघु, टीकरी, गाझीपूर बॉर्डर, नांगलोई इत्यादी क्षेत्रांतील इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आल्या आहेत (Amit Shah Took Emergency Meeting).

दिल्ली हिंसाचारात 83 पोलीस जखमी

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं आणि राजधानी दिल्ली हादरुन निघाली. काही आंदोलकांनी तर थेट पोलिसांवरच हल्ला चढवला. काहींनी पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. या हिसांचारात अनेक पोलिस जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांचा आकडा 83 असल्याची माहिती PTI या वृत्तसंस्थेनं दिली आहे. जखमी पोलिसांमधील 45 जणांना ट्रॉमा सेंटरमध्ये भरती करण्यात आल्याचंही कळतंय.

‘शेतकरी आणि दिल्ली पोलिसांमध्ये झालेल्या बैठकीत ट्रॅक्टर रॅलीसाठी एक मार्ग ठरवून देण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. त्याचबरोबर शेतकऱ्यांना सन्मानित करण्याची व्यवस्थाही पोलिसांनी केली होती. पण शेतकरी आंदोलकांनी हा मार्ग मानला नाही. निश्चित केलेल्या वेळेपूर्वीच ते निघाले. अनेक जागांवर त्यांनी हिंसक घटना घडवून आणल्या, त्यात दिल्ली पोलिसांचे अनेक कर्मचारी जखमी झाले आणि सरकारी मालमत्तेचंही मोठं नुकसान झालं आहे’, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Amit Shah Took Emergency Meeting

संबंधित बातम्या :

Fact Check : शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावरील तिरंगा हटवून आपला झेंडा लावला का? तथ्य काय?

Delhi Tractor Rally : दिल्ली हिंसाचारात 83 पोलीस जखमी, 45 ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल

Delhi Tractor rally : जवळपास 200 कलाकार आणि मुलं ‘लाल किल्ल्या’जवळून रेस्क्यू!

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.