AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जम्मू-काश्मिरमधील दहशतवादी घटनांमध्ये 63.93 टक्क्यांची घट, गृहमंत्रालयाची माहिती

नोव्हेंबर 2019 च्या तुलनेत नोव्हेंबर 2020 मध्ये विशेष दलाचे जवान शहीद होण्याची संख्यांही 29.11 टक्के आणि जिवीतहानी होण्याची संख्या 14.28 टक्के कमी झाली आहे.

जम्मू-काश्मिरमधील दहशतवादी घटनांमध्ये 63.93 टक्क्यांची घट, गृहमंत्रालयाची माहिती
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jan 11, 2021 | 2:33 PM
Share

श्रीनगर : जम्मू-काश्मिरमध्ये (Jammu And Kashmir) हिंसा आणि दहशतसंबंधीत घटनांमध्ये मोठी घट (Terrorists Incidents In Jammu And Kashmir) झाली आहे. यावरुन भारत सरकारची काश्मीर रणनिती किती यशस्वी ठरली हे दिसून येतं. गृह मंत्रालयानुसार, 15 नोव्हेंबर 2020 पर्यंत जम्मू-काश्मिरमध्ये वर्ष 2019 च्या तुलतेन दहशतवादी हल्ल्यांची घटना 63.93 टक्क्यांनी कमी झाली आहे (Terrorists Incidents In Jammu And Kashmir).

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2019 च्या तुलनेत नोव्हेंबर 2020 मध्ये विशेष दलाचे जवान शहीद होण्याची संख्यांही 29.11 टक्के आणि जिवीतहानी होण्याची संख्या 14.28 टक्के कमी झाली आहे.

5 ऑगस्ट 2019 ला केंद्र सरकारने संविधानाच्या कलम 370 आणि 35-A अंतर्गत जम्मू-काश्मिर राज्याच्या विशेष दर्जा समाप्त करत राज्याला दोन केंद्र शासित प्रदेश जम्मू आणि काश्मिर आणि लडाखमध्ये विभागण्यात आलं आहे.

कलम 370 आणि 35-A रद्द केल्यानंतर गृह मंत्रालयाने अनेक कायद्यांचं संशोधन करत अनेक कायदे रद्द केले तर अनेक कायदे लागू केले. गृह मंत्रालयाने वार्षिक उपलब्धिबाबत माहिती दिली. केंद्र शासित प्रदेश आणि राज्य कायदे जम्मू-कश्मिर आणि लडाखमध्ये केंद्र सरकारची सर्वाच मोठं यश आहे, असं गृह मंत्रालयाने स्पष्ट केलं (Terrorists Incidents In Jammu And Kashmir).

जम्मू-काश्मिर प्रकरणात 48 केंद्रीय कायदे आणि 167 राज्याचे कायदे लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. तर, लडाखमध्ये 44 केंद्रीय कायदे आणि 148 राज्य कायदे लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने 31 मार्चला जम्मू-काश्मिरचं पुनर्गठन कायदा आदेश 2020 जारी करण्यात आले आहे. हे जम्मू-काश्मिर पुनर्गठन कायदा 2019 कलम 75 शी संबंधित अडचणी दूर करतात.

मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार, पंतप्रधान विकास पॅकेज अंतर्गत जम्मू-काश्मिरमध्ये चंबा येथून विस्थापित 36,384 कुटुंबांना 5.5 लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य देण्यात आलं आहे. यासोबतच जम्मू-काश्मिरमध्ये पश्चिम पाकिस्तानच्या निर्वासितांच्या (WPR) 5,764 कुटुंबीयांना 5.5 लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य देण्यात आलं आहे.

Terrorists Incidents In Jammu And Kashmir

संबंधित बातम्या :

मोदींच्या मन की बातमधली केसरची शेती कशी देते लाखो कमाईची संधी?

‘काश्मिरची कली’ साताऱ्याच्या पाटलांची सून, माप ओलांडताना खास उखाणा

फारुख अब्दुल्लांची ED कडून चौकशी, ओमर अब्दुल्लांचा सूडाचा आरोप

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ