Railway : पंजाबचा शेतकरी कसा झाला ट्रेनचा मालक; रेल्वेच्या एका चुकीमुळे चमकले नशीब, वाचा अजब प्रकरण
Punjab Farmer Railway : पंजाबच्या एक शेतकरी शताब्दी ट्रेनचा मालक ठरला. त्याला मोबदला न मिळाल्याने कोर्टात याविषयीचे एक प्रकरण सुरू होते. त्यानंतर जे झाले, त्याने रेल्वेला मोठा झटका बसला होता.

A Farmer Became Owner Of Train: हो अगदी खरं आहे. संपूर्ण सिंह हे नाव रेल्वेच्या इतिहासात कायम सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल. कारणही तसंच आहे. या शेतकऱ्याने शताब्दी एक्सप्रेस ही ट्रेन मालकीची करून घेतली. रेल्वे विभागाच्या हलगर्जीपणाचा हे प्रकरण जिवंत उदाहरण होते. या घटनेने रेल्वेला मोठा फटका बसला होता. काय आहे हे प्रकरण, रेल्वेचे नाक कापता कापता कसे वाचले. कोर्टाचे काय होते आदेश, काय आहे हे अजब प्रकरण?
संपूर्ण सिंह यांनी रेल्वे खात्याला हादरवले
संपूर्ण सिंह हे लुधियाना येथील कटाना गावातील रहिवाशी होते. 2007 मध्य रेल्वेने लुधियाना ते चंदीगड रेल्वेसाठी संपूर्ण सिंह यांच्यासह इतर शेतकऱ्यांची जमीन संपादित केली होती. रेल्वेने प्रति एकर 25 लाखांचा भाव ठरवला होता. पण शेजाराच्याच गावातील शेतकऱ्यांना प्रति एकर 71 लाख रुपये मोबदला देण्यात आला होता. त्यानाराजीने संपूर्ण सिंह यांनी रेल्वे विभागाला कोर्टात खेचले. कोर्टाने मोबदला 25 लाखांहून 50 लाख पुढे दीड कोटीपर्यंत केला. उत्तर रेल्वेला 2015 पर्यंत ही रक्कम देण्याचा आदेश दिला होता. पण रेल्वे खात्याने संपूर्ण सिंह यांना केवल 42 लाख रुपयांचा मोबदला दिला. त्यानंतर सिंह यांनी पुन्हा कोर्टाकडे धाव घेतली होती.
शेतकऱ्याने ट्रेनवर केला कब्जा
रेल्वेने संपूर्ण रक्कम न दिल्याने 2017 मध्ये जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनी अमृतसर-दिल्ली स्वर्ण शताब्दी एक्सप्रेस ट्रेन आणि लुधियाना स्टेशन मास्टरचे कार्यालय जप्तीचे आदेश दिले होते. त्यानंतर संपूर्ण सिंह यांनी कोर्टाच्या अधिकाऱ्यांसह शताब्दी ट्रेन ताब्यात घेतली. ते काही मिनिटांसाठी या रेल्वेचे मालक झाले. अर्थात सरकारी प्रक्रिया पूर्ण करत लुधियानाच्या सेक्शन इंजिनिअरने कोर्टाकडे विनंती केली आणि पुढील 5 मिनिटांत ट्रेन मुक्त केली. पण यामुळे रेल्वेचे नाक कापल्या गेल्याची चर्चा रंगली. आपल्याकडे पण तहसीलदारांची खूर्ची जप्त, जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातील सामान जप्तीच्या बातम्या नेहमी वाचण्यात येतात. पण हा प्रकार एकदम दखलपात्र होता. संपूर्ण देशात त्यावेळी त्यांची खूप चर्चा झाली होती.
