हिस्सारची ती आजी, जिने वाचवले पाकिस्तानी क्रिकेटर इंजमाम उल हकचे कुटुंब, कोण होती ती महिला?
Inzamam ul Haq : फाळणीच्या वेळी आपल्याला केवळ एकच बाजू रंगवून सांगण्यात येते. पण त्यावेळी अनेक हिंदू आणि मुस्लिमांनी भाईचारा जपलाच नाही तर एकमेकांचा जीव सुद्धा वाचवला. पाकिस्तानी क्रिकेटर इंजमाम उल हकचे कुटुंब एका हिंदू आजीने वाचवले होते.

देशाच्या फाळणीच्या अनेक वेदनादायी आठवणी आहेत. अनेक कुटुंब उद्धवस्ती झाली. अनेकांना प्राण गमवावे लागले. स्त्रीया आणि मुलांच्या वेदना सांगाव्या तितक्या कमी आहे. पण याही काळात अनेकांनी माणुसकी जपली होती. अनेक हिंदू आणि मुस्लिमांनी भाईचारा जपलाच नाही तर एकमेकांचा जीव सुद्धा वाचवला. पाकिस्तानी क्रिकेटर इंजमाम उल हकचे कुटुंब एका हिंदू आजीने वाचवले होते. दंगलीच्या काळात इंजमाम उल हक यांच्या कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढले होते. फाळणीवेळी हकचे कुटुंबिय हिसारजवळील एका गावात राहत होते. त्याचे शेजारी हे हिंदू होते. त्यांनी हक कुटुंबाचे रक्षण केले आणि त्यांना सुरक्षित स्थळी पोहचवले होते.
इजमाम भारत दौऱ्यावर आल्यावर त्याने या हिंदू कुटुंबाला शोधून काढले. त्या आजीला ही त्याने शोधले. त्याचे कुटुंबिय ती घटना अजूनही विसरलेले नाही. आज जे काही आहोत, त्या हिंदू आजीमुळे आहोत, असे हक कुटुंबिय सांगतात. या कुटुंबाने केवळ वाचवलेच नाही तर सुरक्षित मुल्तान या पाकिस्तानच्या भागापर्यंत पोहचवण्याची व्यवस्था केल्याची आठवण त्याने करुन दिली.
पुष्पा गोयल यांचे हक कुटुंबिय ऋणी
काही वर्षांपूर्वी इंजमाम भारतात आला तेव्हा त्याने हरियाणातील एका तरुणाची भेट घेतली. त्याने इंजमाम याला एक टेलिफोन क्रमांक दिला. हा नंबर त्या मुलाच्या आईचा होता. पुष्पा गोयल असे त्यांचे नाव होते. मुल्तान येथे इंजमामचे आई-वडील राहायचे, त्यांना हा नंबर देण्यास सांगण्यात आले.
इंजमाम याला हा प्रकार काय आहे हे काही कळेना. त्याच्या आईचा नंबर तो पण आपल्या आई-वडिलांसाठी का देत असावा हे त्याला कळले नाही. पण जेव्हा त्याने याविषयी त्याच्या कुटुंबियांशी चर्चा केली. तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याने त्या तरुणाला मिठी मारली. त्याचे धन्यवाद मानले.
इंजमामच्या वडिलांनी लागलीच केला फोन
इंजमामने हा नंबर लागलीच त्याच्या वडिलांना सांगितला. त्यांनी पुष्पा गोयल यांना मुल्तान येथून फोन केला. त्याच्या वडिलांना काही वेळ काय बोलावे तेच सुचेना. त्यांच्या डोळ्यातून आसवांचा पाऊस पडत होता. पुष्पा गोयल या त्यांच्यासाठी देवदूत ठरल्या होत्या. त्यांचे संपूर्ण कुटुंब गोयल यांच्यामुळे वाचले होते. त्यांनी त्यांच्या घरात हक कुटुंबाला आश्रय दिला होता. इतकेच नाही तर मुल्तानपर्यंत त्यांची जाण्याची व्यवस्था पण करून दिली होती.
हांसी येथील हक-गोयल कुटुंब
हरियाणातील हिस्सार जवळ हांसी येथे हक आणि गोयल कुटुंब शेजारी राहत होते. दंगल भडकली तेव्हा गोयल यांनी हक कुटुंबाचे प्राण वाचवले होते. जेव्हा इंजमामचे लग्न ठरले, तेव्हा पुष्पा गोयल यांना खास आमंत्रण आले होते. त्याही मुल्तान येथे या लग्नासाठी पोहचल्या होत्या.
