AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑनलाईन रेल्वे तिकिटाची वैधता किती काळासाठी असते? जाणून घ्या

ऑनलाइन रेल्वे तिकिटाची वैधता प्रवासाच्या प्रकारानुसार ठरते. तिकिटावर दिलेल्या तपशीलांनुसार वैधतेची मुदत वेगवेगळी असू शकते. प्रवाशांनी प्रवासाआधी ही माहिती काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावी, जेणेकरून गैरसमज किंवा अडचणी टाळता येतील.

ऑनलाईन रेल्वे तिकिटाची वैधता किती काळासाठी असते? जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Jun 03, 2025 | 7:53 PM
Share

ट्रेनने प्रवास करताना जनरल तिकीट घेणं आता सोपं झालंय, कारण तुम्ही UTS एपवरून ऑनलाइन तिकीट बुक करू शकता. पण तुम्हाला माहीत आहे का, हे तिकीट किती वेळात अवैध होतं? जर तुम्ही वेळेत प्रवास केला नाही, तर काय होऊ शकतं? चला, या सगळ्याची सविस्तर माहिती घेऊया आणि जाणून घेऊया ऑनलाईन जनरल तिकीट बुक करताना कोणती काळजी घ्यावी!

जनरल तिकीट किती वेळ वैध?

UTS अ‍ॅपवरून तिकीट बुक केल्यावर ते बुकिंगच्या वेळेपासून केवळ 3 तासांपर्यंत वैध असतं. या कालावधीतच प्रवास सुरू करणं अनिवार्य आहे. जर या तीन तासांच्या आत प्रवास सुरू केला नाही, तर तिकीट कालबाह्य ठरतं आणि प्रवासी बिनतिकीट समजला जातो.

रेल्वेच्या नियमानुसार, जर एखादा प्रवासी वैध तिकीट नसताना पकडला गेला, तर त्याच्याकडून 250 रुपयांचा दंड वसूल केला जातो, तसेच सुरुवातीच्या स्थानकापासून गंतव्य स्थानकापर्यंतचं भाडंही आकारलं जातं. त्यामुळे UTS अ‍ॅपवरून तिकीट बुक करताना वेळेचं भान ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.

UTS एपद्वारे तिकीट कसं बुक कराल?

1. तुमच्या स्मार्टफोनवर Google Play Store किंवा App Store वरून UTS एप डाउनलोड करा.

2. अॅपवर नोंदणी करा. यासाठी तुमचा मोबाइल नंबर, नाव आणि पासवर्ड टाकावा लागेल.

3. लॉगिन केल्यानंतर “Normal Booking” किंवा “Platform Ticket” पर्याय निवडा.

4. तुमचं प्रारंभिक स्थानक आणि गंतव्य स्थानक टाका.

5. प्रवाशांची संख्या आणि ट्रेनचा प्रकार ( एक्सप्रेस, पॅसेंजर किंवा मेल) निवडा.

6. UTS वॉलेट, डेबिट/क्रेडिट कार्ड, UPI ( Google Pay, PhonePe, Paytm) किंवा नेट बँकिंगद्वारे पेमेंट करा.

7. तिकीट बुक झाल्यानंतर तुम्हाला SMS आणि एपवर तिकीट मिळेल. “Show Ticket” पर्यायावरून तुम्ही तिकीट पाहू शकता.

ऑनलाइन जनरल तिकीट बुकिंगचे फायदे

1. रेल्वे स्थानकावर लांब रांगा लावण्याची गरज नाही.

2. घरबसल्या किंवा प्रवासादरम्यान तिकीट बुक करा.

3. तिकीट एपवरच उपलब्ध असतं, त्यामुळे प्रिंट काढण्याची गरज नाही.

4. जनरल तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट आणि मासिक पास एकाच एपवर बुक करता येतात.

संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.