राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी काय असतो निकष? भारतात आता किती राष्ट्रीय पक्ष?

भारतात कधी मिळतो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा का काढून घेण्यात आला. कोणत्या पक्षाला मिळाला नवा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा?

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी काय असतो निकष? भारतात आता किती राष्ट्रीय पक्ष?
Follow us
| Updated on: Apr 10, 2023 | 9:13 PM

मुंबई : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी (NCP) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा ( National Party ) निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. एकीकडे देशात आम आदमी पक्ष राष्ट्रीय पक्ष बनत असताना राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कधी दिला जातो. त्यासाठी निवडणूक आयोगाने काय निकष असतात. चला जाणून घेऊया.

राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी खालील निकषांपैकी एक निकष पूर्ण करावी लागते :

१. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला चार किंवा जास्त राज्यांमध्ये वैध मतांपैकी कमीत कमी 6% मते मिळाली पाहिजेत. लोकसभा निवडणुकीत कमीत कमी 4 जागा मिळाल्या पाहिजेत. २. लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला एकूण जागांपैकी कमीत कमी 2% जागा मिळाल्या पाहिजेत आणि या जागा कमीत कमी 3 राज्यांमधून निवडून आल्या पाहिजेत. ३. पक्षाला कमीत कमी 4 राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला पाहिजे.

प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी खालील निकषांपैकी एक निकष पूर्ण करावी लागते :

१. विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी 6% मते आणि एकूण जागांपैकी कमीत कमी 2 जागा मिळाल्या पाहिजेत किंवा

२. लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी 6% मते आणि एकूण जागांपैकी कमीत कमी 1 जागा मिळाली पाहिजे किंवा

३. विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाला एकूण जागांपैकी कमीत कमी 3% जागा किंवा कमीत कमी 3 जागा मिळाल्या पाहिजेत किंवा

४. लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला राज्यातील 25 जागांमागे 1 जागा मिळाली पाहिजे किंवा

५. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी 8% मते मिळाली पाहिजेत.

राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाल्याचे फायदे :

1) राखीव निवडणूक चिन्ह मिळते

2) पक्षाच्या कार्यालयासाठी subsidized दरांमध्ये जमीन मिळते.

3) दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर मोफत प्रक्षेपण होते.

4) निवडणूक आयोगाकडून निवडणूक याद्यांचं मोफत वितरण होते.

भारतात आता 6 राष्ट्रीय पक्ष

बहुजन समाज पक्ष, भारतीय जनता पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट),काँग्रेस, नॅशनल पीपल्स पार्टी, आम आदमी पक्ष

Non Stop LIVE Update
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.