31 डिसेंबरसाठी घरीच दारूची पार्टी करणार असाल तर सावधान… घरात किती दारू ठेवता येते? वाचा नियम

Alcohol Rule : बरेच लोक 31 डिसेंबरला घरीच दारूची पार्टी करतात. तुम्हीही घरी पार्टी करण्याची योजना आखत असाल पार्टी साठी दारू खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. घरात दारू साठवण्याचे नियम जाणून घेऊयात.

31 डिसेंबरसाठी घरीच दारूची पार्टी करणार असाल तर सावधान... घरात किती दारू ठेवता येते? वाचा नियम
Daru Rule
Image Credit source: Google
| Updated on: Dec 20, 2025 | 7:48 PM

2025 ला निरोप देण्याची आणि 2026 चे स्वागत करण्यासाठी संपूर्ण जग तयारी करत आहे. अनेकांनी 31 डिसेंबर साजरा करण्याचे आणि 2026 चे वेलकम करण्याची योजना आखलेली आहे. अनेकांनी मित्रांसोबत घरी पार्टी करण्याची योजना आखली आहे. बरेच लोक 31 डिसेंबरला घरीच दारूची पार्टी करतात. तुम्हीही घरी पार्टी करण्याची योजना आखत असाल पार्टी साठी दारू खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण घरात दारू साठवून ठेवण्याचे काही नियम आहेत. प्रत्येक राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने घरात किती दारू साठवायची याचे नियम ठरवले आहेत. या नियमांचे उल्लंघन झाल्यास तुम्हाला मोठा आर्थक दंड किंवा तुरूंगवास होऊ शकतो. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

प्रत्येक राज्यात वेगळे नियम

घरात दारू साठवण्याचे किंवा दारू खरेदी करण्याचे नियम प्रत्येक राज्यात वेगळे आहेत. बिहार आणि गुजरातमध्ये दारूबंदी आहे. या राज्यांमध्ये दारू सोबत बाळगणे आणि सेवन करणे हा गंभीर गुन्हा आहे. नागालँडमध्येही 1989 पासून दारूवर बंदी आहे. मणिपूरमधील काही जिल्ह्यांमध्ये दारूबंदी आहे. तसेच लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात दारूवर बंदी आहे. उर्वरित राज्यांमध्ये दारूचे वेगवेगळे नियम आहेत.

प्रत्येक राज्यात घरात दारू साठवण्याचे नियम वेगळे आहेत. तसेच एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये दारूच्या बाटल्या वाहतूक करण्यावर देखील मर्यादा आहेत. राजधानी दिल्लीत घरात जास्तीत जास्त 18 लिटर दारू साठवता येते. यात बिअर आणि वाईनचा समावेश आहे. दिल्लीत 9 लिटरपर्यंत रम, व्हिस्की, वोडका किंवा जिन साठवता येते. यासाठी संबंधित व्यक्तीचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त असले पाहिजे.

हरियाणातील नियम

हरियाणामध्ये घरी दारू साठवण्याबाबत वेगवेगळे नियम आहेत. हरियाणातील लोक जास्तीत जास्त 6 बाटल्या भारतीय दारू; 18 बाटल्या परदेशी दारू घरात ठेवू शकतात. या राज्यात जास्तीत जास्त 12 बाटल्या बिअर, जास्तीत जास्त 6 बाटल्या रम; एकूण 6 बाटल्या व्होडका, जिन आणि सायडर; आणि जास्तीत जास्त 12 बाटल्या वाइन साठवता येते.

उत्तर प्रदेशात जास्तीत जास्त 1.5 लिटर परदेशी दारू (व्हिस्की, रम आणि वोडका) घरी साठवता येते. तर 6 लिटर पर्यंत बिअर साठवता येते. तसेच जास्तीत जास्त 2 लिटर वाइन साठवता येते. जर तुम्हाला जास्त दारू साठवायची असेल, तर तुम्हाला L-50 परवाना घ्यावा लागतो. महाराष्ट्रात दारू घरात साठवण्याबाबत नियम नाही, मात्र दारूचा जास्त साठा सापडला तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.