बिहारी गायिका नेहा सिंह राठोड यांना साथ देणारे विधीज्ञ कपिल सिब्बल एका केसची किती फी घेतात?
गायिका नेहा सिंह राठोड यांनी प्रसिद्ध वकील कपिल सिब्बल यांचे मनोबल वाढविण्यासाठी आभार अशी कॅप्शन असणारा फोटो शेअर केल्यानंतर ट्रोलर्सने आता कपिल सिब्बल यांच्यावरही टीका केली आहे.

Kapil Sibal : पहलगाम हल्ल्यानंतर सरकारला प्रश्न विचारुन ट्रोल करणारी बिहारी गायिका नेहा सिंह राठोड यांना ट्रोल केले गेले आहे. त्यांनी पहलगाम हल्ल्यानंतर व्हिडीओ तयार करुन केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यानंतर लखनऊ आणि अयोध्येत नेहा सिंह राठोड यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) चे कलम 152 नोंदवण्यात येऊन भारतीय एकता आणि अखंडता धोक्यात घातल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा सिद्ध झाला तर नेहा सिंह राठोड यांना आजन्म कारावास होऊ शकतो असे म्हटले जात आहे. नेहा सिंह राठोड यांनी याची पर्वा न करता ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांच्या सोबतचा फोटो शेअर करुन ट्रोलरना उत्तर दिले आहे.
हीरालाल सिब्बल यांचा पद्मभूषणने गौरव
कपिल सिब्बल यांचा जन्म ८ ऑगस्ट १९४८ रोजी जालंधर, पंजाब येथे झाला होता, फाळणीनंतर त्यांचे कुटुंब दिल्लीत वसले. त्यांचे वडील हीरालाल सिब्बल सुद्धा एक प्रतिष्ठीत वकील होते, त्यांना भारत सरकारने पद्य भूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.
येथे पाहा पोस्ट –
आप अपने देश, संविधान और अधिकारों के लिये लड़ना शुरू तो कीजिए…आप कभी अकेले नहीं रहेंगे.
मेरा मनोबल बढ़ाने के लिए शुक्रिया सर! @KapilSibal pic.twitter.com/pNZkoCSMzg
— Neha Singh Rathore (@nehafolksinger) May 3, 2025
हार्वर्ड लॉ स्कूलमधून एलएलएम केले
कपिल सिब्बल देशातील सर्वात प्रतिष्ठीत आणि महागड्या वकीलांपैकी एक आहेत. त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत वकीलीचे आहे. कपिल सिब्बल यांनी दिल्ली विद्यापिठातून कायद्याचा अभ्यास केला. त्यानंतर अमेरिकेतील हॉर्वर्ड लॉल स्कुलमधून एलएलएमची डीग्री मिळवली. ते वकील शिवाय एक चांगले कवी देखील आहेत. त्यांनी अनेक कविता लिहील्या आहेत. इंग्रजी आणि हिंदी भाषेत कविता लिहील्या आहेत.
कपिल सिब्बल यांनी दोन लग्न केली
कपिल सिब्बल यांनी दोन लग्न केली. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव नीना सिब्बल आणि दूसऱ्या पत्नीचे नाव प्रेमिला सिब्बल आहे. साल 1973 मध्ये नीना सिब्बल यांच्याशी विवाह केला. त्यांच्यापासून त्यांना दोन मुले झाली एकाचे अमित आणि दुसऱ्याचे नाव अखिल आहे. परंतू 2000 नीना यांना ब्रेस्ट कॅन्सरने निधन झाले होते.त्यानंतर साल 2005 मध्ये प्रोमिला सिब्बल यांचं लग्न झाले. त्यांचे भाऊ कंवल सिब्बल माजी परराष्ट्र सचिव होते.
कपिल सिब्बल यांची नेटवर्थ
मीडिया बातमीनुसार कपिल सिब्बल यांच्याकडे ₹250 कोटी संपत्ती आहे. त्यांचे दिल्ली, नोएडा आणि अन्य शहरात त्यांची संपत्ती आहे.आणि एका केसची ते सुमारे 18-20 लाख रु फी आकारतात.
