अख्खं जग फिरली, पण ‘या’ 5 गोष्टींमुळे ज्योती मल्होत्राचा गेम, पोलिसांना संशय कसा आला?
ज्योती मल्होत्रा हिला हेरगिरीच्या आरोपांखाली अटक करण्यात आलंय. तिला पोलिसांनी नेमकं कसं पकडलं, असे विचारलं जात आहे.

Youtuber Jyoti Malhotra : यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आल आहे. सध्या ती पोलीस कोठडीत असून पोलीस तिची कसून चौकशी करत आहेत. तिच्या अटकेनंतर भारतभरातून तब्बल 12 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अटकेनंतर ज्योती मल्होत्रा पोलिसांच्या निशाण्यावर नेमकी कशी आली? पोलिसांना तिच्याबाबत नेमकं काय खटकलं? असं विचारलं जात आहे.
ज्योतीने मरियन शरीफची मुलाखत घेतली
ज्योती 2023 मध्ये करतारपूर कॉरिडॉरमधून पाकिस्तानात गेली होती. त्यानंतर ज्योती पाकिस्तानच्या मुख्यमंत्री मरियन शरीफ यांनाही भेटली होती. ज्योतीने मरियन शरीफची मुलाखत घेतली होती. एक यूट्यूबर मरियन शरीफ यांच्या इतक्या जवळ कशी पोहोचली असा संशय भारतातील सुरक्षा यंत्रणांना आला.
दानीशसोबत मैत्रीचे संबंध
त्यानंतर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी दूतावासातल्या पार्टीला पाहुणी म्हणून गेली होती. पाकिस्तानी अधिकारी दानीशसोबत मैत्रीचे संबंध तिच्या यूट्यूबच्या व्हिडीओंमधून दिसले. त्यामुळे दानीशसोबत तिचे एवढे जवळचे संबंध कसे? असा प्रश्न सुरक्षा यंत्रणांना पडला.
पाकिस्तान, चीन असे देश फिरली
ज्योतीच्या ट्रॅव्हल ब्लॉगनुसार ती 17 एप्रिल 2024 रोजी एका महिन्यासाठी पाकिस्तान होती. ती पुढे 15 मेपर्यंत पाकिस्तानात राहिली आणि भारतात परतली. पुढच्या 25 दिवसांनी ती चीनमध्ये गेली. ती चीनमध्येही एक महिना राहिली. चीन आणि पाकिस्तानमध्ये ती व्हीआयपी पर्सन म्हणून राहिल्यामुळे तपास यंत्रणांना संशय आला. 10 जुलैला ज्योती नेपाळची राजधानी काठमांडूलाही गेली. पाकिस्ताननंतर तिला चीनचा व्हिसा कसा मिळाला? असा प्रश्न सुरक्षा यंत्रणांना पडला.
विनामात फस्ट क्लासमध्ये जायची
ज्योती मल्होत्रा नोकरी करत नाही. हिसारमध्ये तिचं छोटं घर आहे. तिरीही ती पाकिस्तान, चीन, थायलंड, इंडोनेशिया, भूतान, नेपाळ या देशांमध्ये जाऊन आली. ती विनामात फस्ट क्लासमध्ये जायची. पंचतारांकित हॉटेलमध्ये ती राहायची. ज्योतीच्या राहण्याचा, प्रवासाचा खर्च नेमकं कोण करायचं, असा प्रश्न सुरक्षा यंत्रणांना पडला.
तपास यंत्रणांना वरील सर्व संशय आल्याने ज्योती मल्होत्रा हिला बेड्या ठोकण्यात आल्या. सध्या ती पोलीस कोठडीत आहे. तिची कसून चौकशी केली जात असून भविष्यातही अनेक खळबळजनक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.