Double masks COVID-19 : दोन मास्क घालताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!

दोन मास्क नेमके कसे, कुठे आणि कधी घालावे? याची काही माहिती समोर आली आहे. (How to use Double masks facts)

Double masks COVID-19 : दोन मास्क घालताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा!
अमेरिकेचीही 'मास्कमुक्ती'कडे वाटचाल


मुंबई : देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रसार हा हवेद्वारे होत आहे, असा धक्कादायक दावा प्रसिद्ध मेडिकल जर्नल Lancet च्या अहवालात प्रसिद्ध करण्यात आला आहे. यानंतर सर्वांनी दोन मास्कचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दोन मास्क घातल्याने तुम्हाला कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते. दोन मास्क नेमके कसे, कुठे आणि कधी घालावे? याची काही माहिती समोर आली आहे. (How to use Double masks facts)

डबल मास्क कसा असावा?

तुम्ही वापरत असलेला डबल मास्क तुमच्या चेहऱ्यावर व्यवस्थित आहे की नाही याची काळजी घ्या. जर तो योग्यरित्या बसत नसेल तर तो कोरोनाचे विषाणू सहज तुमच्या शरीरात शिरकाव करु शकतात, त्यामुळे ते धोकादायक ठरते. दोन मास्क घातल्याने तुमचा कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचाव होऊ शकतो.

डबल मास्क कसा घालावा?

अमेरिकेतील रोग आणि नियंत्रण प्रतिबंधक केंद्र (सीडीसी) यांच्या अभ्यासानुसार, दोन मास्क घालणं हे फार प्रभावी मानले जाते. पण दोन मास्क व्यवस्थितरित्या लावल्यास तुम्ही कोरोनापासून स्वत:चा बचाव करु शकता.

योग्यरित्या डबल मास्क लावण्याचे दोन पद्धती

कपड्यांच्या मास्कसह सर्जिकल मास्क वापरा

कोरोनापासून संरक्षणासाठी केवळ कपड्याचा मास्क वापरणे प्रभावी ठरत नाही. पण जर तुम्ही कपड्याच्या मास्कसोबत सर्जिकल मास्क वापरलात तर तो फार प्रभावी ठरतो. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होते. (How to use Double masks facts)

यासाठी तुम्ही पहिल्यांदा सर्जिकल मास्क घाला. त्यावर कपड्याचा मास्क वापरा. जेणेकरुन सर्जिकल मास्क ड्राप्लेट इन्फेक्शनपासून बचाव करतो. तर कपड्याचा मास्क तो व्यवस्थित फिट ठेवण्यास मदत करतो.

सर्जिकल मास्क बांधून त्याचा वापर करा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुम्हाला सर्जिकल मास्क फोल्ड करावा लागेल. त्यानंतर दोन्ही कानाच्या बाजूला त्याला छोटीशी गाठ बांधा. त्यानंतर तो मास्क फोल्ड करा. बाहेर आलेलं एक्सट्रा कापड आतील बाजूला दुमडा. यानंतर मास्क चेहऱ्यावर लावा आणि नाकाच्या बाजूला (Nose Wire) दाबा. तसेच चांगल्या प्रतीचा मास्क खरेदी करा.

डबल मास्क घालताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

 • अमेरिकेच्या सीडीसीनुसार, डबल मास्क घालतेवेळी दोन्हीही सर्जिकल मास्क वापरु नये.
 • डबल मास्क घालतेवेळी त्यात N95 मास्कचा समावेश करु नका.

दोन मास्क कधी आणि कुठे घालावे?

 • लोकल ट्रेन, बस स्टॉप, विमानतळ यासारख्या गर्दीच्या ठिकाणी दोन मास्कचा वापर करा.
 • तसेच सार्वजनिक ठिकाणी तसेच कामाच्या ठिकाणी दोन मास्कचा वापर करा.
 • त्यासोबतच अंत्यत गर्दीच्या ठिकाणी मास्कसोबत फेसशिल्ड वापरा.
 • लहान मुलांनी दोन मास्क लावणे टाळा.
 • वापरलेले मास्क दररोज धुवा
 • तुमचे नाक, तोंड, पूर्णपणे झाकले जाईल, असाच मास्क वापरा.
 • मास्क शेअर करु नका.
 • मास्क काढल्यावर हात सॅनिटाईज करा.
 • काही वेळाने मास्क बदला

(How to use Double masks facts)

संबंधित बातम्या : 

रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्याची रुग्णांच्या नातेवाईकांना सक्ती करू नका; राजेश टोपे यांचे निर्देश

Corona Update India : देशभरात 3 लाख 52 हजार नवे कोरोनाग्रस्त, 2800 अधिक रुग्णांचा बळी