AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shocking : लग्नाच्या 2 वर्षांनंतर नात्यात वादाची ठिणगी; नवऱ्याने बायकोला ४ गोळ्या झाडून संपवलं

Delhi shocking : दिल्लीत राहणाऱ्या नराधमाने स्वत:च्या ३० वर्षीय बायकोची हत्या केल्याची घटना घडली आहे. त्याने बायकोला गोळ्या झाडून संपवलं.

Shocking : लग्नाच्या 2 वर्षांनंतर नात्यात वादाची ठिणगी; नवऱ्याने बायकोला ४ गोळ्या झाडून संपवलं
| Updated on: Jun 26, 2026 | 1:58 PM
Share

दक्षिण दिल्लीच्या संगम विहार भागातून हादरवणारी घटना समोर आली आहे. एका ३० वर्षीय महिलेची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. तिच्या नवऱ्याने वादानंतर महिलेला संपवल्याची माहिती हाती आली आहे. बायकोची हत्या केल्यानंतर नवरा घटनास्थळावरून फरार झाला. ही संपूर्ण घटना गुरुवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, शुभम राजपूत असे आरोपी नवऱ्याचे नाव आहे. त्याने बायकोची ४ गोळ्या झाडून हत्या केली. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या तपासात घटनास्थळी निकामी काडतुसे आढळून आली आहेत.

पोलिसांच्या तपासातून माहिती समोर आली की, कविता आणि शुभम राजपूत या दोघांचं २ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. या दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. नवरा शुभम हा बायको कविताला सारखा धमकी द्यायचा. अनेकदा त्याने जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही पोलीस तपासात उघड झालं आहे.

मृत कविताच्या नातेवाईकांच्या आरोपानुसार, शुभमचं एका महिलेसोबत अफेअर होतं. यामुळे दोघांमध्ये वाद व्हायचे. पोलिसांच्या दाव्यानुसार, आरोपीचं एका दुसऱ्या महिलेसोबत अफेअर होते. त्यामुळे तो नेहमी बायकोला जीवे मारण्याची धमकी द्यायचा. नातेवाईकांनी केलेल्या आरोपानुसारही तपास सुरू करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी पुढे सांगितलं की, या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी अनेक पथके नेमण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दिल्लीत गोळीबारात एकाचा मृत्यू

तत्पूर्वी, उत्तर दिल्लीच्या बवाना भागात गुरुवारी रात्री गोळीबारीची घटना घडली. पोलिसांना रात्री साडेआठ वाजता गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. दिल्लीतील पूठ खुर्द गावात २२ वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल केले. बाळकृष्ण असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. बाळकृष्ण याच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. २२ वर्षीय बाळकृष्ण याच्यावर गोळीबार करून हल्लेखोर फरार झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा