AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICSE board exam: कोरोनाच्या धोक्यामुळे ICSE बोर्डाकडून दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण बोर्डाकडून देण्यात आले आहे. | ICSE 10 board examinations cancels

ICSE board exam: कोरोनाच्या धोक्यामुळे ICSE बोर्डाकडून दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय
दहावीची परीक्षा रद्द
| Updated on: Apr 20, 2021 | 9:59 AM
Share

नवी दिल्ली: देशातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (ICSE board) बोर्डाने अखेर दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर बारावीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच होईल. या परीक्षेची नवी तारीख आणि वेळापत्रक आणखी काही दिवसांनी जाहीर करण्यात येईल, असे ICSE बोर्डाकडून सांगण्यात आले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण बोर्डाकडून देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच सीबीएसई बोर्डाचीही दहावीची परीक्षा रद्ध झाली होती. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार या दोन्ही बोर्डांच्या पावलावर पाऊल ठेवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (ICSE 10 board exam cancels in the wake of COVID19 situation)

राज्य सरकार दहावीसाठी सीबीएसई पॅटर्न राबवणार का?

महाराष्ट्रात परीक्षेशिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करणं अशक्य, असल्याचं मत महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाच्या माजी अध्यक्षांनी व्यक्त केलं आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन परीक्षा घेणं उचित शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञांच मतं आहे. सीबीएसई विद्यार्थ्यांची देशातील एकूण संख्या 19 लाख आहे. तर, एकट्या महाराष्ट्रातील एसएससीची विद्यार्थी संख्या 16 लाख आहे. याशिवाय बारावीची विद्यार्थी संख्या देखील वेगळी आहे. त्यामुळे परीक्षेविना विद्यार्थ्यांना पास करणं अशक्य आहे.

‘या’ राज्यांमध्येही परीक्षा स्थगित

तेलंगणा सरकारने कोविड -19 प्रकरणातील वाढ पाहता इंटरमीडिएट प्रथम वर्ष (इयत्ता ११ वी) च्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पुढील वर्गात प्रमोट करण्याचा आणि दहावीची वार्षिक परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. विशेष मुख्य सचिव चित्रा रामचंद्रन म्हणाले, राज्यातील सध्याची साथीची परिस्थिती आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना महामारी पाहता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), मध्य प्रदेश बोर्ड, राजस्थान बोर्ड, हिमाचल प्रदेश बोर्ड आणि महाराष्ट्र मंडळानेही परीक्षा स्थगित केल्या आहेत. पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांनी सांगितले आहे की ते परिस्थितीवर नजर ठेवत आहेत आणि याक्षणी त्यांनी बोर्ड परीक्षा घ्यायचे की नाही याचा निर्णय घेतला नाही.

संबंधित बातम्या:

आधी म्हणाले परीक्षा पुढे ढकला, ऑनलाईन घ्या; आता बारावीचे विद्यार्थी परीक्षा रद्द करण्यासाठी आक्रमक

राज्य सरकार दहावीसाठी सीबीएसई पॅटर्न राबवणार का? शिक्षणतज्ञांचं मत काय?

UGC NET 2021 Postpone : सीबीएसई, नीट पाठोपाठ नेटची परीक्षा लांबणीवर टाका, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची मागणी

(ICSE 10 board exam cancels in the wake of COVID19 situation)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.