सीमा हैदर गेली तर आम्ही सर्व मरुन जाऊ, सचिनच्या वडीलांनी असे का म्हटले ?

सीमाच्या मुलांसह तिला आम्ही घरची सून म्हणून स्वीकारले आहे. जर तिच्यात काही खोट आम्हाला दिसली नाही. परंतू...जर

सीमा हैदर गेली तर आम्ही सर्व मरुन जाऊ, सचिनच्या वडीलांनी असे का म्हटले ?
Seema-Haider-and-Sachin-Meena-with-his-parents
Image Credit source: socialmedia
| Updated on: Jul 13, 2023 | 9:47 PM

नवी दिल्ली : पाकिस्तानी सीमा हैदर आणि उत्तरप्रदेशातील नोएडाचा सचिन मीणा याच्या अनोख्या प्रेमकहाणीमुळे मिडीयाच्या उड्या पडल्याने या सचिन याचे वडील कंटाळले आहेत. आमच्या सहा पिढ्यात कोणी पोलीस स्टेशन वा कोर्टाची पायरी चढली नव्हती. आता मलाही दोन दिवस पोलिस ठाण्यात रहावे लागले. जर सीमा एजंट आहे तर सरकारने तिची खुशाल चौकशी करावी आणि सत्य सर्वांसमोर आणावे आपली काही हरकत नाही. परंतू ती गेली तर मात्र आम्ही जगू शकणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

पब्जी खेळताना प्रेम जुळल्याने पाकिस्तानातून नेपाळ मार्गे भारतात आलेल्या सीमा हैदर या चार मुलांची आई असलेल्या 27 वर्षीय महिलेने दोन्ही देशातील मिडीयामध्ये या अनोख्या सरहद्द पार प्रेमाची चर्चा सुरु आहे. मिडीया या दोघांचा इतका पिच्छा पुरवित आहे की सचिन काल परवा घरात झालेल्या गर्दीने गुदमरल्याने अक्षरश: बेशुद्ध पडल्याचे त्याचे वडील मित्तरलाल यांनी अमर उजाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

सून म्हणून स्वीकारले आहे

सीमाच्या मुलांसह तिला आम्ही घरची सून म्हणून स्वीकारले आहे. जर तिच्यात काही खोट आम्हाला दिसली नाही. आमचे शेजारी, मोहल्ल्यातील लोकात इतकेच काय आजूबाजूच्या गावातही तिला चांगले मानले जात. तिने आमची संस्कृती स्वीकारली आहे. जर माझ्या मुलाने तिला स्वीकारली आहे तर आम्ही तिचे आणि तिच्या मुलांचे पालनपोषण करु. सरकारला माझी विनंती आहे की तिची चौकशी करुन काय तो सोक्षमोक्ष एकदाचा करावा असे सचिन याचे वडील मित्तरलाल म्हणतात. खरे सांगाल तर तिच्यात काही दोष नाहीत. मी तिला ओळखलं आहे. त्यांचे हे निर्व्याज प्रेम आहे ते एकमेकांसह जगू शकत नाहीत असे मित्तरलाल सिंग यांनी सांगितले.

मुलाला नोकरी जाणेही अवघड 

माझा मुलगा तेरा ते चौदा हजार एका बनियाच्या दुकानातून कमवितो. परंतू आता त्याला घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. मी देखील येथील हिरो होंडा कंपनी जवळील एका नर्सरीतून रोपं आणून विकतो. दिवसाला माझी कमाई दोनश ते तीनशे रुपये होते. या चार मुलांना आता कसे सांभाळणार या प्रश्नावर जर उपरवाल्याने चोच दिली आहे तर दाणाही देणारच, आमची घरची परिस्थिती बेताचीच असली तरी आम्ही आहे त्यात सांभाळून घेऊ असे त्यांनी म्हटले आहे.