Gyanvapi raw:ज्ञानवापी मुद्द्यावर कोर्टात जात असाल, तर तो निर्णय मान्य करायला हवा, सरसंघचालक मोहन भागवतांनी टोचले मुस्लीम पक्षकारांचे कान

मंदिरांशी हिंदूंच्या भावना निगडित होत्या, म्हणून तिथे तोडफोड करण्यात आली. आजच्या अनेक मुस्लिमांचे पूर्वजही तेव्हा हिंदूच होते, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. हिंदूंनी आत्तापर्यंत खूप सहन केले. या देशाचा एक तुकडाही आपण गमावल्याचे भागवत म्हणाले.

Gyanvapi raw:ज्ञानवापी मुद्द्यावर कोर्टात जात असाल, तर तो निर्णय मान्य करायला हवा, सरसंघचालक मोहन भागवतांनी टोचले मुस्लीम पक्षकारांचे कान
Mohan Bhagvat on gyanvapiImage Credit source: TV 9 marathi
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 9:59 PM

नागपूर – ज्ञानवापीच्या (Gyanvapi)मुद्द्यावर हिंदू मुस्लिमांनी आपसात बसून निर्णय करायला पाहिजे होता, मात्र तसं होत नाही, मग आता जर कोर्टात जात आहात, तर मग कोर्टाचा निर्णय मानला पाहिजे, (court decision)या शब्दात सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagvat)यांनी मुस्लीम पक्षकारांचे कान टोचले आहेत. नागपुरात संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षाच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मशिदीत शिवलिंग मिळते हे महत्त्वाचे आहे. पूजा पद्धती वेगळी आहे म्हणून आपण वेगळे आहोत असे दोन्ही समाजांनी समजू नये, असे आवाहनही मोहन भागवतांनी यावेंळी केले. आमच्या सगळ्यांचे पूर्वज एकच आहेत, याची आठवण त्यांनी करुन दिली. दोन्ही समाजांनी एकमेकांचा सन्मान करण्याची गरजही त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केली.

हिंदूंनी खूप सहन केले, देशाचा तुकडाही गमावला

या देशात आत्तापर्यंत हिंदुंनी खूप सहन केल्याचे मोहन भागवत यावेळी म्हणाले. ज्ञानवापीचा इतिहास ना आत्ताच्या हिंदूंनी तयार केला ना आत्ताच्या मुस्लिमांनी तयार केला असे त्यांनी सांगितले. काही परकीय आक्रमकांनी हिंदूंची मानसिकता खच्ची करण्यासाठी आणि आजन्म त्यांना गुलामगिरीत ठेवण्यासाठी मंदिरांची तोडफोड केली असे भागवत म्हणाले. मंदिरांशी हिंदूंच्या भावना निगडित होत्या, म्हणून तिथे तोडफोड करण्यात आली. आजच्या अनेक मुस्लिमांचे पूर्वजही तेव्हा हिंदूच होते, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. हिंदूंनी आत्तापर्यंत खूप सहन केले. या देशाचा एक तुकडाही आपण गमावल्याचे भागवत म्हणाले.

हिंदूंना काही जिंकायचे नाही पण हरायचे पण नाही

हिंदूंना कोणाविरोधात जिंकायचे नाही मात्र हारायचे पण नाही, असे भागवत म्हणाले. कुमाला देशात भीती दाखवायची नाही पण घाबरायचं पण नाही, असंही ते म्हणाले. देशात आणि जगात काही लोक जे तेढ निर्माण करतात, त्यांना उत्तर द्यायचं आहे, मात्र त्यांच्या बहकाव्यात यायचं नाही, हेही भागवतांनी स्पष्ट केले आहे. आम्हाला कोणाला जिंकायचे नाही मात्र दुसऱ्यांना आम्हाला जिंकायचं आहे, आणि तसे प्रयत्न सुद्धा सुरू आहे, त्यापासून आपण सावध राहायचं आहे, असंही भागवत म्हणाले. सुंदर जग निर्माण करण्याची ताकद भारतात आहे आणि ते यशस्वी करण्यासाठी संघसुद्धा प्रयत्न करत आहे, असेही भागवतांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

कोरोना काळ आणि संघ

कोरोना काळात संघ शिक्षा वर्ग झाले नाहीत, मात्र संघाचे काम थांबले नाही, असे मोहन भागवतांनी सांगितले. कोरोना रुग्णांच्या सेवेत संघ कार्यरत होता, असेही ते म्हणाले. कोरोना काळात मोठा जनसंपर्क झाला, त्यानंतर राममंदिर निधी संकलन करतानासुद्धा संपर्क साधल्याचे त्यांनी सांगितले. कुठल्या पूजेमुळे, धर्मामुळे एक नाही तर देशामुळे एक आहोत, असेही ते म्हणाले. सगळ्या प्रकारच्या वातावरणात सगळ्यांना घेऊन चालतो तो मानव धर्म म्हणजे हिंदू धर्म आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळेच देशात राहणाऱ्या लोकांना आपल्या अस्तित्वासाठी कोणाशी झगडा करायची गरज पडली नाही. हिंदूंची स्वतंत्रता, जगाला स्वातंत्र्य देण्यासाठी आहे, असेही भागवत म्हणाले. कोणाची आपसात लढाई होता कामा नये आणि हेच आम्ही जगाला देऊ इच्छितो, असे भागवतांनी स्पष्ट केले.

Non Stop LIVE Update
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.