गरज असेल तरच घराबाहेर पडा… महाराष्ट्रासह 26 राज्याला 13 तास संकटाचे; IMDची मोठी अपडेट काय?

भारतीय हवामान विभागाने (IMD) 27 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रासह देशातील 26 राज्यांसाठी 13 तासांचा तीव्र हवामानाचा इशारा दिला आहे. मुसळधार पाऊस, 85 किमी/तास वेगाने वाहणारे वारे, आणि दरडी कोसळण्याचा धोका वर्तवला आहे. नागरिकांना गरज असल्यासच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी व मच्छिमारांनी विशेष काळजी घ्यावी.

गरज असेल तरच घराबाहेर पडा... महाराष्ट्रासह 26 राज्याला 13 तास संकटाचे; IMDची मोठी अपडेट काय?
IMD Alert
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 26, 2026 | 3:30 PM

हवामान खात्याने उद्या 27 ऑगस्टसाठीच्या हवामानाचा मोठा अंदाज व्यक्त केला आहे. उद्या देशातील 26 राज्यांसाठी धोक्याचे आहेत. या राज्यांसाठी पुढचे 13 तास संकटाचे असणार आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली आणि महाराष्ट्रासहीत 26 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच काही राज्यांमध्ये ताशी 85 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही आहे. तसेच डोंगराळ भागात दरड कोसळणे आणि भूस्खलनाच्या घटना घडण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. गरज असेल तरच घरातून बाहेर पडा. घरातून बाहेर पडताना एकदा हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडा, असं हवामान खात्याने म्हटलं आहे.

पूर्व भारताच्या अनेक राज्यात विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. अतिमुसळधार पावसामुळे या राज्यातील शेतकऱ्यांना शेतीपिकांचं मोठं नुकसान सोसावं लागण्याची शक्यता आहे. या दरम्यान वारा वेगाने वाहणार असल्याने जंगल परिसरात मोठ मोठे वृक्ष उन्मळून पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तसेच पाचहून अधिक राज्यात गारपिट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या खाडीतून वेगाने वारे वाहणार असल्याने पूर्वेकडील राज्यांच्या अडचणीत भर पडणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय.

कोणत्या कोणत्या राज्यात इशारा?

पूर्वेकडे आसाम आणि आसपासच्या परिसरात चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती तयार झाली आहे. ही सिस्टिम येत्या 24 तासात झारखंड मार्गे पश्चिम-उत्तर- पश्चिम दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे. उद्या 27 ऑगस्ट रोजी देशातील 26 राज्यात तेज हवेसह अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे. यूपी, बिहार, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-कश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, महाराष्ट्र, गुजरात, आसम, केरळ, तामिळनाडु, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, तेलंगाना आणि सिक्किम आदी राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यता आली आहे. या राज्यांमध्ये प्रति ताशी 80 ते 85 किलोमीटर प्रचंड वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच शेतकरी आणि मच्छिमारांसाठीही विशेष इशारा देण्यात आला आहे.

नाशिकला अलर्ट

दरम्यान, नाशिकला आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. शहर आणि परिसरात वेगवान वाऱ्यासह मध्यम सरींचा पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज घाटमाथ्याच्या परिसरात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे. शहर, उपनगरांसह जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज आहे.

Follow Us