AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Crime : भयंकर, सासरच्यांनी उभी पोर जाळली, बाप रडत रडत तिचा जळका पाय घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला !

ममता नेहमी वडिलांना आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत सांगत असे. तसेच आपल्याला इथून घेऊन जा असे म्हणायची. पण जेव्हा वडिल तिच्याकडे पोहचले तेव्हा ममताचा मृत्यू झाला आहे. ममताची हत्या करुन मृतदेह सोन नदीजवळ गाडण्यात आला. नंतर गाडलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढला आणि जाळला.

Bihar Crime : भयंकर, सासरच्यांनी उभी पोर जाळली, बाप रडत रडत तिचा जळका पाय घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला !
भयंकर, सासरच्यांनी उभी पोर जाळलीImage Credit source: tv9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jun 10, 2022 | 6:11 PM
Share

बिहार : एका विवाहितेचा छळ करत पती आणि सासऱ्याने तिची हत्या (Murder) करुन मृतदेह जाळल्या (Burnt)ची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली आहे. जेव्हा महिलेचे वडील तेथे पोहचले तेव्हा तिचा केवळ पायच बाकी होता. महिलेच्या वडिलांनी तिचा पाय घेऊन मुफस्सिल पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. ममता असे मयत मुलीचे नाव आहे. लग्न झाल्यापासून सासरचे लोक ममताचा पैशासाठी छळ करत होते. दररोज तिला मारहाण (Beating) करत होते, असे ममताचे वडिल अखिलेश बिंद यांनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी ममताचा पती शत्रुघ्न बिंद आणि सासरा राम प्यारे बिंद यांच्या विरोधात हुंडा आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहेरुन एक लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

ममता हिचा विवाह बरौली गावातील शत्रुघ्न बिंद याच्यासोबत मे 2021 मध्ये झाला होता. लग्नानंतर सासरचे लोक तिला माहेरुन एक लाख रुपये आणण्यास सांगत होते. मात्र माहेरचे लोक पैसे देऊ शकत नव्हते. त्यामुळे सासरचे लोक तिला रोज मारहाण करायचे. अखेर पैशासाठी सासरच्यांनी तिची सोमवारी हत्या करुन मृतदेह जाळला. घटनेची माहिती मिळताच वडिलांनी धाव घेतली. मात्र ममताचा जळून मृत्यू झाला होता. तिचा केवळ एख पायच सहीसलामत होता. वडिलांनी एका पिशवीत तो पाय टाकला आणि पोलीस ठाणे गाठले. पायातील जोडवी आणि पैंजणावरुन अखिलेश यांनी ही आपली मुलगी असल्याचा दावा केला आहे. सध्या हा पाय डीएनए रिपोर्टसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे.

आधी मृतदेह गाडला मग बाहेर काढून जाळला

ममता नेहमी वडिलांना आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत सांगत असे. तसेच आपल्याला इथून घेऊन जा असे म्हणायची. पण जेव्हा वडिल तिच्याकडे पोहचले तेव्हा ममताचा मृत्यू झाला आहे. ममताची हत्या करुन मृतदेह सोन नदीजवळ गाडण्यात आला. नंतर गाडलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढला आणि जाळला. यामध्ये महिलेचा पाय वाचला होता, असे भोजपूरच्या एएसपींनी सांगितले. हा पाय घेऊन वडिलांनी पोलिसांकडे सुपूर्द केला. आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी मुलीच्या वडिलांनी केली आहे. (In Bihar a married woman was killed for her dowry and her body was cremated)

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार