Corruption case: कोट्यवधींच्या भ्रष्टाचार प्रकरणात आता अर्पिता मुखर्जीच्या ब्युटी पार्लरचे गूढ, जीएसटी नंबरचेही रहस्य, ईडी आणखी धाडी टाकणार?

| Updated on: Aug 02, 2022 | 2:08 PM

धक्कादायक बाब म्हणजे अर्पिताचे बांग्लादेशशी कनेक्शन असल्याचेही समोर आले होते. बांग्लादेशीतील काही उच्चपदस्थ व्यक्ती या प्रकरणात सहभागी असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तसेच आता नव्याने एका ब्युटीपार्लरचा जीएसटी नंबरही अर्पिताच्या घरात सापडला आहे. या ब्युी पार्लरचा अर्पिताशी काय संबंध होता, हे शोधण्याचा प्रयत्न आता करण्यात येतो आहे. 

Corruption case: कोट्यवधींच्या भ्रष्टाचार प्रकरणात आता अर्पिता मुखर्जीच्या ब्युटी पार्लरचे गूढ, जीएसटी नंबरचेही रहस्य, ईडी आणखी धाडी टाकणार?
भ्रष्टाचाराचे ब्युटी पार्लर कनेक्शन
Image Credit source: social media
Follow us on

कोलकाता – देशभरात खळबळ माजवणाऱ्या पश्चिम बंगालमधील (W. Bangla)शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात नवनवी माहिती समोर येते आहे. प्रत्येक नव्या माहितीतून आश्चर्याचा धक्का तपास यंत्रणेसह सर्वसामान्य जनतेला बसतो आहे. 1ऑगस्ट म्हणजेच सोमवारीही ईडीने या प्रकरणातील संशयित आरोपी अर्पिता मुखर्जीच्या (Arpita Mukherjee)काही मालमत्तांवर धाडी टाकल्या. यावेळी सापडलेल्या एका जीएसटी (GST)नंबरने तपास अधिकाऱ्यांना नवा धक्का बसला आहे. आता पुन्हा या प्रकरणात नव्या धाडी पडण्याची शक्यता आहे. ईडीच्या एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे की केंद्रीय तपास यंत्रणा पार्थ चॅटर्जी आणि त्यांच्या नीकटवर्तीयांची पुन्हा एकदा मंगळवारी चौकशी करण्याचे ठरवते आहे. धक्कादायक बाब म्हणजे अर्पिताचे बांग्लादेशशी कनेक्शन असल्याचेही समोर आले होते. बांग्लादेशीतील काही उच्चपदस्थ व्यक्ती या प्रकरणात सहभागी असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तसेच आता नव्याने एका ब्युटीपार्लरचा जीएसटी नंबरही अर्पिताच्या घरात सापडला आहे. या ब्युी पार्लरचा अर्पिताशी काय संबंध होता, हे शोधण्याचा प्रयत्न आता करण्यात येतो आहे.

11 बँक खाती सील

23 जुलै रोजी ईडीने तत्कालीन उदोयगमंत्री पार्थ चॅटर्जी यांना भ्रष्टाचाराप्रकरणी अटक केली आहे. अर्पिता मुखर्जी आणि पार्थ हे दोघेही ३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. पार्थ यांना अटक केल्यानंतर पाच दिवसांनी ममता बॅनर्जी यांनी त्यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी केली आहे. सोमवारचया छाप्यात सापडलेला जीएसटी नंबर हा एका ब्युटीपार्लरचा असल्याची माहिती समोर आली आहे. या ब्युटी पार्लरचा अर्पिता मुखर्जी हिच्याशी काय संबंध आहे, याचा शोध आता घेण्यात येतो आहे. ईडीने अर्पिताच्या बेलघरिया येथील फ्लॅटचे सीसीटीव्ही फूटेज आणि एन्ट्री डायरी तपासली आहे. माय गेट एप आणि सीसीटीव्हीचे फुटेज सुरक्षित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ब्युटी पार्लरच्या आडून काय करत होती अर्पिता?

अर्पिताने एक ब्युटी पार्लरचा व्यवसाय चालवण्यासाठी एका जीएसटी नंबरचा उपयोग केल्याचे समोर आले आहे. त्याबरोबरच आणखी एक जीएसटी नंबरही सापडला आहे, तो कोणत्याही व्यवसायाशी सलंग्न नाही. या ब्युटी पार्लरमधून काय करण्यात येत होते, याचा तपास आता करण्यात येतो आहे. तसेच टॅक्स वाचवण्यासाठी या बेकायदेशीर मार्गांचा वापर करण्यात येत होता का, याचाही शोध घेण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

पार्थ यांची उत्तरे देण्यास टाळाटाळ

ईडीच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीत पार्थ चॅटर्जी सहकार्य करत नसल्याचे सांगण्यात येते आहे. चौकशीच्या वेळी उत्तरे देण्याऐवजी ते शांत बसतात, अशीही माहिती आहे. एका षडयंत्राचे आपण बळी ठरल्याचे पार्थ यांनी शुक्रवारी सांगितले आहे. अटक केल्यापासून सातत्याने दमायला होत असल्याची तक्रार पार्थ करीत आहेत. प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी, अर्पिताच्या घरी सापडलेले पैसे आपले नसल्याचा दावा पार्थ चॅटर्जी करीत आहेत. आगामी काळात या प्रकरणातील सत्य बाहेर येईल असेही ते सांगत आहेत.