AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, त्रिवेंद्र सिंह रावतांच्या जागी कुणाला संधी ?

भाजपच्या कोअर ग्रुपच्या बैठकीत नेतृत्वबदलाबाबत चर्चा झाली नसल्याचं सांगितलं जात असलं तरी उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या जागी नवा चेहरा दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, त्रिवेंद्र सिंह रावतांच्या जागी कुणाला संधी ?
| Updated on: Mar 08, 2021 | 4:02 PM
Share

नवी दिल्ली : उत्तराखंडच्या राजकारणात मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहेत. रोज नव्या घडामोडी घडत असल्यामुळे राज्य सरकारच्या स्थिरतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशावेळी सोमवारी अचानक भाजपच्या कोअर ग्रुपची बैठक पार पडली. त्यामुळे अनेक शक्यतांना आता तोंड फुटलं आहे. या बैठकीत केंद्रीय पर्यवेक्षकाच्या रुपात पक्षाचे उपाध्यक्ष आणि उत्तराखंडचे प्रभारी दुष्यंत गौतम उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीत नेतृत्व बदलाच्या विषयावर कुठलीही चर्चा झाली नसल्याचं सांगितलं जात आहे.(Trivendra Singh Rawat is likely to be removed from the post of Chief Minister)

भाजपच्या कोअर ग्रुपच्या बैठकीत नेतृत्वबदलाबाबत चर्चा झाली नसल्याचं सांगितलं जात असलं तरी उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या जागी नवा चेहरा दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशास्थितीत मंगळवारी सकाळीच त्रिवेंद्र सिंह रावत दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. दिल्ली दौऱ्यात ते पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्रिवेंद्र सिंहांनाही बैठकीची कल्पना नाही!

उत्तराखंड कोअर कमिटीची झालेली बैठक ही पूर्व नियोजित नव्हती. अशावेळी अचानकपणे झालेली ही बैठक राज्यातील राजकारण तापवणारी ठरली आहे. भाजपची ही बैठक राजधानी गॅरसॅन इथं पार पडली. मुख्यमंत्री रावत यांनाही या बैठकीबाबत कल्पना नव्हती, असं सांगण्यात येत आहे.

त्रिवेंद्र सिंह रावतांच्या जागी कुणाला संधी ?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तराखंडमध्ये नेतृत्व बदलाच्या वेगवान हालचाली घडत आहेत. अशावेळी रावत यांच्या जागी धन सिंह रावत किंवा सतपाल महाराज यांच्या नावाची चर्चा सुरु असल्याचं कळतंय. या दोन नावांबाबत सर्व आमदारांच्या सहमतीवर काम सुरु आहे. जर या दोन्ही नावांवर एकमत झालं नाही तर केद्र सरकारकडून नैनीतालचे लोकसभा खासदार अजय भट्ट आणि राज्यसभा खासदार अनिल बलूनी यांचं नाव पुढे केलं जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

इतर बातम्या :

आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा वाढवता येईल का?; मराठा आरक्षणप्रश्नी सर्व राज्यांना नोटीस

‘या’ कारणामुळे नव्या कार खरेदीवर मिळणार 5 टक्के डिस्काऊंट; नितीन गडकरींची मोठी घोषणा

Trivendra Singh Rawat is likely to be removed from the post of Chief Minister

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.