अंड्याची गाडी लावणाऱ्यास आयकर नोटीस, 50 कोटींचा टर्नओवर, काय आहे नेमका प्रकार?
प्रिंसकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली. त्यात त्याच्या कागदपत्रांचा वापर करुन कोणी बनवाट कंपनी बनवल्याचे स्पष्ट झाले. डिसेंबर 2022 मध्ये दिल्लीत “प्रिंस एंटरप्राइज” नावाची एक बनावट फर्म तयार करण्यात आली. त्या फर्मचा जीएसटी क्रमांकही मिळवण्यात आला.

Fake Company Income Tax Notice: एखाद्या गाडी लावणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न किती असेल? त्या व्यक्तीला आयकरची नोटीस येऊ शकते का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी असणार आहे. परंतु एका अंड्याची गाडी लावणाऱ्या व्यक्तीला आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. त्या व्यक्तीच्या नावावर नवी दिल्लीत कंपनी आहे. त्या कंपनीचा कोट्यवधीमध्ये व्यवहार आहे. 50 कोटींचा टर्नओव्हर त्या कंपनीचा आहे. त्याच्यावर 6 कोटी जीएसटी बाकी आहे. आयकर विभागाने त्याला नोटीस पाठवून त्याच्याकडून बँक स्टेटमेंट आणि इतर कागदपत्रे मागवले आहे. त्यामुळे त्याच्या पूर्ण परिवारास धक्का बसला आहे. मध्य प्रदेशातील दमोह येथील हा युवक आहे. प्रिंस सुमन असे त्याचे नाव आहे.
प्रिंस सुमन हा अंड्याची गाडी लावून त्याची उपजिविका चालवतो. परंतु त्याच्या नावावर प्रिंस इंटरप्रायजेज नावाची एक कंपनी दिल्लीत रजिस्टर्ड आहे. त्या कंपनीने 2022 ते 2024 दरम्यान 50 कोटी रुपयांचा व्यवहार केला आहे. ही कंपनी चमडे, लाकूड आणि आयरनचा व्यापार करते. परंतु या कंपनीने जीएसटी भरले नाही. त्यामुळे आयकर विभागाने प्रिंस सुमन याला 6 कोटींची नोटीस पाठवली आहे.
अजूनपर्यंत दिल्ली पाहिलेच नाही
प्रिंस सुमन याने सांगितले की, दिल्ली अजूनपर्यंत ते पाहिलेच नाही. मी फक्त एक-दोन वेळा इंदूरपर्यंत गेलो आहे. तसेच मी कोणालाही माझे पॅन कार्ड आणि आधार कार्डसुद्धा दिले नाही. त्यानंतर माझ्या नावावर बोगस कंपनी तयार करण्यात आली. प्रिंस याचे वडील श्रीधर सुमन यांची लहान किराणा दुकान आहे. या प्रकरणात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांनी वकिलांच्या मदतीने आयकर विभागालाही पत्र लिहिले आहे.
TOI च्या रिपोर्टनुसार, 20 मार्च रोजी प्रिंस याला नोटीस मिळाली. त्यानंतर प्रिंस याचा पूर्ण परिवारास धक्का बसला. प्रिंस म्हणतो, ‘मी दिवसभर अंड्याच्या गाडीवर चारशे-पाचशे रुपते कमवतो. माझ्यासाठी 50 कोटींची रक्कम दुसऱ्या जगातील आश्चर्य वाटते.’
प्रिंसकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली. त्यात त्याच्या कागदपत्रांचा वापर करुन कोणी बनवाट कंपनी बनवल्याचे स्पष्ट झाले. डिसेंबर 2022 मध्ये दिल्लीत “प्रिंस एंटरप्राइज” नावाची एक बनावट फर्म तयार करण्यात आली. त्या फर्मचा जीएसटी क्रमांकही मिळवण्यात आला. त्यानंतर कंपनीत कोट्यवधींचे व्यवहार झाले.
