INDIA Bloc Protest: ज्ञानेश कुमार हटवा, लोकशाही वाचवा, दिल्लीत इंडिया आघाडीचा हल्लाबोल, निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर थेट मोर्चा

INDIA Bloc Protest Against Election Commission: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दिल्लीत रणकंदन उठले आहे. विरोधी पक्ष नेत्यांच्या खासदारांनी दिल्ली दणणाणून सोडली आहे. ज्ञानेश कुमार हटवा, लोकशाही वाचवा असा घोषणा देत दिल्लीत इंडिया आघाडीने हल्लाबोल चढवला आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर थेट मोर्चा काढण्यात आला आहे.

INDIA Bloc Protest: ज्ञानेश कुमार हटवा, लोकशाही वाचवा, दिल्लीत इंडिया आघाडीचा हल्लाबोल, निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर थेट मोर्चा
इंडिया आघाडीचा महामोर्चा, ज्ञानेश कुमारा यांच्याविरोधात एल्गार
| Updated on: Oct 06, 2026 | 11:44 AM

INDIA Bloc Protest Against Election Commission:  ज्ञानेश कुमार हटवा, लोकशाही वाचवा असा घोषणा देत दिल्लीत इंडिया आघाडीने हल्लाबोल चढवला आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर थेट मोर्चा काढण्यात आला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोगाविरोधात विरोधी पक्षाच्या खासदारांनी रस्त्यावर उतरत रान उठवले आहे. पोलिसांनी मोर्चा अडवल्यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधींसह सर्व पक्षीय खासदारांनी रस्त्यातच ठाण मांडले आहे. यावरून एकच गोंधळ उडाल्याचे दिसून आले.

खासदारांचा रस्त्यातच ठिय्या, पोलिसांचा मोठा बंदोबस्त

Loading...

निवडणूक आयोगाच्या कथित वादग्रस्त कारभाराविरोधात, विशेष सखोल पुनर्निरीक्षण प्रक्रियेविरोधात(SIR) आणि कथित मतचोरीविरोधात इंडिया आघाडी दिल्लीत पेटून उठली आहे. संसद भवनातील मकर द्वारापासून इंडिया आघाडीच्या खासदारांनी मोर्चाला सुरुवात केली. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. पण पोलिसांनी हा मोर्चामध्येच अडून धरल्याने वातावरण तापले आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची वेळ आता आली आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माध्यमांना दिली. गेल्या 15 मिनिटांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे.  निवडणूक आयोगाच्या कार्यालयापासून 100 मीटरवरच पोलिसांनी मोर्चा अडवला आहे.

मोर्चात कोण कोण?

या लाँगमार्चमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, शिवसेनेचे संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि इतर खासदार, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यासह इतर अनेक पक्षांचे अनेक बडे नेते, खासदार सहभागी झाले आहेत.30 सप्टेंबर रोजी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक झाली होती. या बैठकीतच इंडिया आघाडीने आज मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार हा मोर्चा काढण्यात आला आहे. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.

निवडणूक आयोगासमोरच धरणे आंदोलन

दरम्यान पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. याठिकाणी पोलिसांनी बॅरेकेटिंग केली आहे. विरोधी गोटातील खासदारांना अडवले आहे. पोलीस त्यांना निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाण्यापासून रोखत आहेत. सोशल मीडियावर राहुल गांधी यांनीविषयीची एक पोस्ट लिहिली आहे. त्यात पोलिसांनी त्यांना अडवल्याचे म्हटले आहे. आकाशवाणी भवनाच्या गेट क्रमांक 3 वर हे सर्व खासदार थांबलेले आहेत.

जवळपास 19 पक्ष ज्ञानेश कुमारांविरोधात रस्त्यावर

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीतील जवळपास 19 पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. ते निवडणूक आयोगाच्या कारभारावर संतप्त आहेत. ज्ञानेश कुमार यांनी भाजपला निवडणूक जिंकण्यासाठी मदत केल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. मत चोरीचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. इंडिया आघाडी एकत्रितपणे आयोगाविरोधात एकवटली असली तरी आम आदमी पक्षाने या मोर्चापासून फारकत घेतली आहे. हा पक्ष डाव्यांसोबत मिळून जंतरमंतरवर आंदोलन करत आहे. 3 किमी पायी चालून इंडिया आघाडीतील खासदारांनी निवडणूक आयोगाच्या जवळ धरणे आंदोलन सुरू केले आहे. AAP सह DMK या मोर्चात सहभागी झालेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us