भारताची कमाल, AI ने ऑपरेट होणारं पहिलं फायटर जेट बनवलं, बॉम्बिंगची क्षमता ऐकून चीन-पाकिस्तानचे धाबे दणाणतील
भारताने कमाल करत AI ने ऑपरेट होणारं पहिलं फायटर जेट बनवलं आहे. या विमानाची बॉम्बिंग क्षमता ऐकून चीन-पाकिस्तानचे धाबे दणाणतील. जाणून घ्या

जागतिक संरक्षण क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित लढाऊ विमानांची एन्ट्री झाली आहे. भारतानेही एआय आधारित फायटर जेट विमान बनवलं आहे. बेंगळुरूच्या फ्लाइंग वेज डिफेंस अँड एयरोस्पेस (FWDA) ने पहिलं एआय आधारित फायटर जेट तयार केलं आहे. हे विमान 1500 हून अधिक वजनाचं आहे. हे विमान 350 किलो वजनाचं भार वाहू शकते. या विमानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
कंपनीच्या दाव्यानुसार, विमान हे एआयच्या मदतीने चालवण्यासाठी विकसित करण्यात आल्याचे सांगण्यात आले हे. या विमानाचं कमाल ध्वनी वेग हा 0.9 ते 0.85 पट ठेवण्याचं नियोजन आहे. तर याची रेंज 1500 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. या विमानात शस्त्रसाठा देखील करता येईल. या विमानातून 350 किलो वजनाचा बॉम्बगोळा हा पाकिस्तान , चीनवर टाकण्यास सक्षम आहे. कंपनीने विमानात टर्बोफॅन इंजिन बसवण्याची योजना आखली आहे. परदेशावर अवलंबून राहणे कमी करण्याचा हा उद्देश आहे. हे विमान लष्करासाठी तयार करण्यात आलं असून 90 टक्के स्वदेशी आहे. या विमानाचे इंजिन देखील भारतीय बनावटीचं आहे. या विमानाची चाचणी करण्यात आली असून दोन महिन्यात पहिल्या उड्डाणासाठी सज्ज होईल.
कंपनीच्या म्हणण्यांनुसार, एफडब्लूडी कार्यक्रम राबवला जाईल. आता पुढील टप्प्यात तंत्रज्ञान विकास, टेस्ट, सिस्टिमच्या एकीकरणावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. या विमानाचा क्रुझिंग वेग हा ताशी 500-600 किमी असण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. हे विमान 1500 किमी पेक्षा जास्त पल्ला आणि दोन तासांपेक्षा जास्त काळ टिकून राहण्याच्या उद्देशाने डिझाइन तयार करण्यात आलं आहे. या विमानाचा आकार हा 10 मीटर बाय मीटर असा आहे. एफडब्लूजी प्रकल्प हा पारंपारिक वैमानिक नियंत्रित लढाऊ विमानांवर अवलंबून राहण्याऐवजी एआय आधारित विमानांच्या आधारित आहे. खरंतर त्यांचा दृष्टीकोन हा मॉबिंग डॉक्ट्रिन आधारित आहे. या संकल्पनेत एआय आधारित विमाने (Plane) एकत्र पद्धतीने काम करतात. माहितीची देवाणघेवाण करतात. त्याचबरोबर रियल टाइममध्ये निर्णया घेण्यास तत्पर असतात.
