चीनला शह देत भारताची फिलिपीन्सशी जवळीक, संबंध सुधारण्यासाठी रडार सिस्टमचीही ऑफर

भारताने चीनसोबतच्या तणावपूर्ण संबंधांनंतर नवी रणनीती आखली आहे. यानुसार चीनला शह देण्यासाठी आता आपल्या इतर राष्ट्रांशी जवळीक करण्यास सुरुवात केली आहे.

चीनला शह देत भारताची फिलिपीन्सशी जवळीक, संबंध सुधारण्यासाठी रडार सिस्टमचीही ऑफर
Follow us
| Updated on: Nov 09, 2020 | 10:40 PM

नवी दिल्ली : भारताने चीनसोबतच्या तणावपूर्ण संबंधांनंतर नवी रणनीती आखली आहे. यानुसार चीनला शह देण्यासाठी आता आपल्या इतर राष्ट्रांशी जवळीक करण्यास सुरुवात केली आहे. यानुसारच भारताने चीनच्या जवळ जाणाऱ्या फिलिपीन्ससोबत संबंध सुधारण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी भारताने फिलिपीन्सला समुद्र सुरक्षेसाठी आणि देखरेखीसाठी आवश्यक असलेल्या रडार सिस्टमची ऑफर दिली आहे. नुकताच फिलिपीन्सने दक्षिण चीन महासागरात ऑईल एक्सप्लोरेशनवरील बंदी हटवली आहे. त्यामुळे येथे चीनचा शिरकाव होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने हालचाली करण्यास सुरुवात केल्याचं बोललं जात आहे (India increasing ties with philippines standoff with China offers to provide radar system).

फिलिपीन्सने दक्षिण चीन महासागरातील खनिजतेल शोधमोहिमेवरील बंदी हटवल्याने या ठिकाणी चीनच्या शिरकावाचे रस्ते खुले झाले आहेत. त्याला शह देण्यासाठी भारताने फिलिपीन्सला समुद्री डोमेन जागरुकता (एमडीए) कार्यक्रमांतर्गत समुद्रातील देखरेख करण्यास आवश्यक रडार सिस्टम देण्याची तयारी दर्शवली आहे. शुक्रवारी (6 नोव्हेंबर) भारत आणि फिलिपीन्सच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये एक व्हर्च्युअल बैठकही झाली. यात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि तियोदोरो लोक्सिन ज्युनिअर यांनी एका संयुक्त आयोगाची पुन्हा सुरुवात केली. या आयोगाची 5 वर्षांपूर्वी बैठक झाली होती.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, “दोन्ही देशांनी संरक्षण आणि समुद्र सहकार्याला अधिक मजबूत करण्यावर सहमती दर्शवली आहे. विशेषपणे सैन्य प्रशिक्षण आणि शिक्षण, कौशल्यविकास, नियमित सद्भावना यात्रा आणि संरक्षण उपकरणांची खरेदीवर भर दिला जाणार आहे. याशिवाय संबंधित संस्थांमध्ये माहितीची देवाणघेवाण आणि विशेष प्रशिक्षणासह दहशतवादविरोधी क्षेत्रातही सहकार्य वाढवलं जाण्यावर सहमती झाली.”

चीन आणि फिलिपीन्स जवळ येण्याची शक्यता

ऑक्टोबरमध्ये फिलिपीन्सचे अध्यक्ष रोड्रिगो दुतेर्ते यांच्या सरकारने दक्षिण चीन सागरमध्ये खनिजतेल मोहिमेवरील बंदी हटवली आहे. त्यामुळे चीनच्या खनिजतेल शोधणाऱ्या कंपन्यांचा फिलिपीन्समध्ये शिरकाव करण्याचा मार्ग खुला झालाय.

हेही वाचा :

भारत चीनची आर्थिक नाकेबंदी करणार, चिनी कंपन्यांना रोखण्यासाठी नवा प्लॅन

भारत चीन सीमेवरील तणाव, शरद पवारांची माजी हवाईदल प्रमुख आणि माजी परराष्ट्र सचिवांशी चर्चा

भारत चीनमधील वाढता तणाव, अमेरिकेचे दोन मंत्री भारत दौऱ्यावर

India increasing ties with philippines standoff with China offers to provide radar system

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.