Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला, 9 दहशतवादी तळं उद्ध्वस्त, भारताची मोठी कारवाई
Indian Army Operation Sindoor : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याकडून जशास तसं उत्तर देण्यात आलं आहे. भारताकडून बुधवारी मध्यरात्री 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terrorist Attack) भारतातील 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारताने या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून आहे. भारताने शेजारी देशासह सुरू असलेल्या या तणावादरम्यान बुधवारी मध्यरात्री (7 मे) पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 15 दिवसांनी ही कारवाई केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. ही तीच ठिकाणे आहेत जिथून भारतावर दहशतवादी हल्ले करण्याचे निर्देश दिले गेले होते. दरम्यान या हल्ल्यात काय काय नुकसान झालंय, याबाबत माहिती समजू शकलेली नाही. भारतीय सैन्य दलाकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ नुसार (Operation Sindoor) ही कारवाई करण्यात आली आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तान हादरलं
भारतीय सैन्य दलाच्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईनंतर पाकिस्तान हादरलं आहे. भारताने मुजफ्फराबाद, कोटली आणि बहावलपूरमध्ये मोठा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. पाकिस्तानी माध्यमांच्या दाव्यानंतर काही वेळातच भारत सरकारनेही या हल्ल्याची अधिकृतपणे पुष्टी केली.
भारतीय सैन्य दलाकडून हवाई हल्ल्याआधी सोशल मीडियावरुन एक पोस्ट करण्यात आली होती. “प्रहाराय सन्निहिताः, जयाय प्रशिक्षिताः” आणि Ready to Strike, Trained to Win”, अशा आशयाची पोस्ट करण्यात आली होती. त्यानुसार काही वेळातच पहलगाम हल्ल्याचा हिशोब चुकता केला जाणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. सैन्य दलाने केलेल्या या कारवाईचं आता सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.
भ्याड हल्ल्यात निष्पाप भारतीयांचा मृत्यू
दरम्यान पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर धर्म विचारुन गोळीबार केला होता. त्या भ्याड हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट होती. पाकड्यांना जशास तसं उत्तर द्यावं, अशी मागणी भारतीयांची होती. अखेर भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानवर हवाई हल्ला करत शेजाऱ्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत.
भारतीय सैन्याचं पाकिस्तानला जशास तसं उत्तर
Justice is Served.
Jai Hind! pic.twitter.com/Aruatj6OfA
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) May 6, 2025
पाकिस्तानवर डिजीटल स्ट्राईक
दरम्यान भारताकडून पहलगााम हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील कलाकार आणि क्रीडापटूंच्या सोशल मीडिया खात्यांवर भारतात बंदी टाकण्यात आली. शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर या माजी पाकिस्तान क्रिकेटपटूंच्या यूट्युब चॅनेलवर भारतात बंदी टाकून त्यांची आर्थिक कोंडी करण्यात आली.