AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ताशी 75 किमी वेगाने सोसाट्याचे वारे, 21 राज्यात हवामान विभागाचा अलर्ट, पावसासह थेट..

राज्यात पावसाने पाठ फिरवली. परतीचाही पाऊस म्हणावा तसा झाला नाही. कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यातच आता भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. देशात पुढील काही दिवस पाऊस असणार आहे.

ताशी 75 किमी वेगाने सोसाट्याचे वारे, 21 राज्यात हवामान विभागाचा अलर्ट, पावसासह थेट..
India Meteorological Department
| Updated on: Oct 10, 2026 | 6:35 PM
Share

देशात यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यातच परतीचा पाऊस काही भागात चांगलाच धुमाकूळ घालताना दिसतोय. उद्या काही भागात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीपासून उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेशपर्यंतच्या क्षेत्रांत पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, अनेक राज्यांत पावसासह वादळ होण्याची शक्यता आहे. यादरम्यान ताशी 40 ते 60 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. दक्षिण भारतातील ‘गल्फ ऑफ मन्नार’ (मन्नारचे आखात) जवळ तयार होत असलेल्या हवामान प्रणालीकडेही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे; या प्रणालीच्या प्रभावामुळे तामिळनाडू आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाची हजेरी आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

दक्षिण भारतातील गल्फ ऑफ मन्नार परिसरात तयार होत असलेल्या हवामान प्रणालीवरही लक्ष ठेवले जात आहे. याचा परिणाम तामिळनाडू आणि आसपासच्या भागांत पाऊस व जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामानातील हा बदल शेतकऱ्यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. कारण उष्णता वाढत असतानाच हा अत्यंत मोठा दिलासा म्हणावा लागेल.

काही भागांत पावसामुळे तापमान कमी होऊ शकत असले, तरी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटामुळे अडचणी वाढू शकतात. पाटणा, गया आणि भागलपूरपासून ते उत्तर प्रदेशातील मेरठ, आग्रा आणि गाझियाबादपर्यंतच्या क्षेत्रांत हवामानात बदल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील काही भागात पाऊस होण्याचा अंदाज आहे.

ईशान्य भारतात पुढील काही दिवस पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशात 11-12 आणि 15-16 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आसाम आणि मेघालयमध्ये 11-12 ऑक्टोबर आणि 13 ते 16 ऑक्टोबर या कालावधीत पाऊस पडू शकतो. गुवाहाटी, शिलाँग आणि आसपासच्या परिसरातील हवामानात तफावत असू शकते. महाराष्ट्रात स्थिती गंभीर आहे. कोरडा दुष्काळ पडला आहे. सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे