AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनिश्चिततेच्या काळात जागतिक व्यवस्थेला आकार देण्यासाठी भारत सज्ज, WITT समिट 2026 पूर्वी TV9 चे एमडी आणि सीईओ बरुण दास यांचे विधान

WITT Summit : TV9 नेटवर्कचे ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट-2026’ 23-24 मार्च रोजी दिल्ली येथे आयोजित केले जाणार आहे. यापूर्वी TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी मोठं विधान केलं आहे.

अनिश्चिततेच्या काळात जागतिक व्यवस्थेला आकार देण्यासाठी भारत सज्ज, WITT समिट 2026 पूर्वी TV9 चे एमडी आणि सीईओ बरुण दास यांचे विधान
TV9 MD CEO Barun DasImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Mar 20, 2026 | 8:52 PM
Share

TV9 नेटवर्कचे ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट-2026’ 23-24 मार्च रोजी दिल्ली येथे आयोजित केले जाणार आहे. याबाबत बोलताना TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी म्हटले की, ‘जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि भू-राजकीय संघर्ष असूनही भारत एक मोठी शक्ती म्हणून उदयास आला आहे. गेल्या वर्षभरापासून जागतिक व्यवस्थेवर मोठा दबाव आहे. मागील वर्षी जगाने अभूतपूर्व हल्ले पाहिले, ज्यामध्ये टॅरिफचा वापर पूर्वी कधी झाला नव्हता. 2026 च्या सुरुवातीला अनेक आघाड्यांवर युद्धाच्या सर्वात वाईट शक्यता सत्यात उतरल्या, ज्यामुळे जग आर्थिक अनिश्चिततेच्या टप्प्यात प्रवेशले.हा संघर्ष थेट भारताच्या सीमेजवळ नसला तरी त्याचा आर्थिक परिणाम जागतिक स्तरावर जाणवत आहे. नवी दिल्लीपासून न्यू जर्सीपर्यंत त्याचा प्रभाव दिसून येतो. त्यांनी ऊर्जा सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली आणि ती जागतिक विकासावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले.

विकासाचा मुख्य आधार ऊर्जा

पुढे बोलताना बरून दास म्हणाले की,’भारत आणि जगाच्या विकासाचा मुख्य आधार ऊर्जा आहे. जेव्हा यावर सर्व बाजूंनी दबाव येतो, तेव्हा भविष्य अधिकच अंधकारमय वाटते.’ त्यांनी भारताच्या धोरणाबद्दल बोलताना दास म्हणाले की, भारताचे धोरण या तत्त्वावर आधारित आहे की राष्ट्रे कायमस्वरूपी आघाड्यांपेक्षा कायमस्वरूपी हितसंबंधांनुसार कार्य करतात. या अस्थिर काळात यामुळे ठोस परिणाम मिळत आहेत.

बरुण दास पुढे म्हणाले की, भारत इतिहासातील एका वेगळ्या टप्प्यावर उभा आहे. जग युद्ध, असमानता आणि हिंसेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना, भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. येथे जगातील सर्वात तरुण लोकसंख्यांपैकी एक आहे. तसेच, जागतिक मंचावर आत्मविश्वासाने आपली भूमिका मांडणारा देश म्हणून भारत झपाट्याने पुढे येत आहे. भारताची लोकशाही व्यवस्था, उद्योजकतेची ऊर्जा आणि तांत्रिक क्षमता एका परिवर्तनशील शतकाची पायाभरणी करत आहेत. तंत्रज्ञान, संस्कृती आणि समाज या तिन्ही क्षेत्रांचा शिखर भारताकडे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य भाषण

23-24 मार्च रोजी दिल्ली येथे होणाऱ्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट-2026’ चे मुख्य आकर्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य भाषण असेल. पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मागील आवृत्तीत त्यांनी समावेशक विकासाच्या मंत्राने प्रेरित नव्या भारताची दृष्टी स्पष्ट केली होती.

समिटचा विषय ‘भारत आणि विश्व’

या वर्षीच्या समिटचा विषय ‘भारत आणि विश्व’ असा आहे. यात प्रमुख विचारवंत, व्यावसायिक नेते आणि नागरी समाजातील दिग्गज सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या भाषणासोबतच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, ज्योतिरादित्य सिंधिया आणि अश्विनी वैष्णव यांचाही सहभाग अपेक्षित आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार हेही समिटमध्ये सहभागी होणार आहेत.

सौरव गांगुली आणि बाबा रामदेव यांचीही उपस्थिती

या समिटमध्ये बोर्डरूममधील तज्ज्ञ प्रोफेसर राम चरण, मार्कस वामबाक आणि एमएचपी इंडिया (पोर्श कंपनी) चे ग्रुप COO आणि CEO बर्नड ओ. होर्मन यांसारखे जागतिक नेतेही सहभागी होणार आहेत. तसेच, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली आणि योगगुरू बाबा रामदेव हेही या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.

Follow Us
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार.
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका.
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी.
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?.
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या.
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?.
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या.
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल.
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर.