इस्त्रायलकडून भारत 300 कोटींचे 100 स्पाईस बॉम्ब खरेदी करणार

भारताच्या हवाई दलाने 26 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या बालकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हल्ला केला होता. त्यावेळी या स्पाईस बॉम्बचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता.

इस्त्रायलकडून भारत 300 कोटींचे 100 स्पाईस बॉम्ब खरेदी करणार

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने इस्त्रायलशी 100 स्पाईस बॉम्ब खरेदी करण्याचा करार केला आहे. यासाठी 300 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. भारताच्या हवाई दलाने 26 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या बालकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हल्ला केला होता. त्यावेळी या स्पाईस बॉम्बचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता.

या करारानुसार, येत्या तीन महिन्यात इस्त्रायलद्वारे भारतीय हवाई दलाला 100 स्पाईस बॉम्ब दिले जाणार आहेत. हे स्पाईस बॉम्ब 60 किमीपर्यंत आपलं लक्ष्य अचूक भेदतात. यात MK-84, BLU-109, APW आणि RAP-2000 यांसारख्या विविध अद्यावत गोष्टींचा समावेश आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीला जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 40 भारतीय जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर म्हणून 26 फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालकोट येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हवाई हल्ला केला होता. बालकोटमधील हल्ल्यासाठी मिराज 2000 या लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला होता. तसेच या हल्ल्यादरम्यान स्पाईस बॉम्बचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता.

काय आहेत स्पाईस बॉम्बची वैशिष्ट्ये

  • स्पाईस बॉम्ब हे आपले लक्ष्य अचूक भेदण्यासाठी विशेष ओळखले जातात
  • या बॉम्बसोबत एक विशिष्ट जीपीएस गायडन्स किट असतो.
  • यामुळे हे बॉम्ब अचूक लक्ष्य भेदण्यात यशस्वी ठरतात.
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *