भारतीय नौदलाच्या तीन व्हिडिओनंतर पाकिस्तानच्या हृदयाचे ठोके वाढले, आता पाकिस्तानने पुन्हा धाडस केल्यास निशाण्यावर ही ७ ठिकाणे
पाकिस्तानकडून झालेल्या या हल्ल्यास तोंड देण्यासाठी भारताचे लष्कर सज्ज आहे. त्याबाबत भारताने पाकिस्तानला यापूर्वीच अल्टिमेटम दिला आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधी मोडली तर त्याचा मोठा फटका पाकिस्तानला बसणार आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यात पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची ९ तळ उद्ध्वस्त केली. यानंतर पाकिस्तानने पुन्हा काही धाडस केले तर भारत चौफेर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. यासाठी भारताच्या लष्करातील तिन्ही दलांकडून सतत काम सुरु आहे. यामुळे तिन्ही आघाड्यांवर पाकिस्तानवर मोठी कारवाई केली जाऊ शकते. शस्त्रसंधीनंतरही भारताचे नौदल सतत युद्ध सराव करत आहे. ज्यामुळे पाकिस्तानच्या हृदयाचे ठोके वाढत आहेत. कारण भारतीय नौदलाने तीन व्हिडिओ जारी केले आहेत. जे भारताची तयारी दाखवत आहे.
१३ मे, १७ मे आणि १८ मे रोजी भारतीय नौदलाने व्हिडिओ जारी केले आहे. त्यामाध्यमातून पाकिस्तानला संदेश दिला जात आहे. यावेळी समुद्री मार्गाने पाकिस्तानवर हल्ला करण्याची वेळ आली आहे. ७ ते ९ मे या कालावधीत भारतीय हवाई दलाने आपले पराक्रम दाखवले. भारतीय लष्कर आणि बीएसएफने नियंत्रण रेषेवरील आणि सीमेवरील पाकिस्तानी चौक्यांना जोरदार उत्तर दिले. भारताकडे वाईट नजर टाकल्याने काय परिणाम होतील, हे सांगितले.
भारताने पाकिस्तानला यापूर्वीच अल्टिमेटम दिला आहे. जर पाकिस्तानने शस्त्रसंधी तोडून हल्ला करण्याचे धाडस केले तर यावेळी त्याचा संपूर्ण नाश निश्चित आहे. भारताला पाकिस्तानची चांगली जाणीव आहे. म्हणूनच भारत सतत युद्धसराव करत आहे. त्यामुळे पाकिस्तानी राज्यकर्त्यांची चिंता वाढत आहे. भारतापासून बचाव करण्यासाठी शहबाज मुनीर चीन आणि तुर्कस्तानला गळ घालत आहे.
पाकिस्तानचा कोणताही भाग भारतीय सैन्याच्या आवाक्याबाहेर नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानच्या आत १०० किलोमीटरपर्यंत कहर केला आहे. पाकिस्तानात प्रवेश न करता पाकिस्तानचे नुकसान केले. आता गरज पडल्यास पाकिस्तानात घुसून लाहोर ते इस्लामाबादपर्यंत इतका मोठा हल्ला भारत करू शकतो. त्या हल्ल्यातून पाकिस्तान कधीही सावरू शकणार नाही.
- पहिले टारगेट: कहुटा संशोधन प्रयोगशाळा, एक युरेनियम समृद्धीकरण केंद्र आहे. हे इस्लामाबाद जवळ आहे.
- दुसरे टारगेट – सरगोधा एअरबेस, जे सेंट्रल एअर कमांडचे मुख्यालय आहे.
- तिसरे टारगेट – मसरूर एअरबेस, जो पाकिस्तानचा सर्वात मोठा एअरबेस आहे. हे कराचीमध्ये आहे.
- चौथे टारगेट – इस्लामाबादमध्ये असलेले आयएसआय मुख्यालय.
- पाचवे टारगेट: राष्ट्रीय संरक्षण संकुल. हे इस्लामाबादजवळ स्थित एक क्षेपणास्त्र उत्पादन केंद्र आहे.
- सहावे टारगेट: बलुचिस्तानमध्ये असलेले जिना नौदल तळ हे देखील एक नौदल स्थापना केंद्र आहे.
- सातवे टारगेट – सोनमियानी क्षेपणास्त्र चाचणी श्रेणी. हे एक अण्वस्त्र क्षेपणास्त्र केंद्र आहे.
