AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IndiavsPakistan: भारत – पाकिस्तानात वादग्रस्त वातावरण, 16 मे पासून महागणार ‘या’ गोष्टी

IndiavsPakistan: भारत - पाकिस्तानमध्ये तणावग्रस्त वातावरण असताना, 16 मे पासून अनेकांच्या खिशाला बसेल फटका, 16 मे पासून महागणार 'या' गोष्टी, भारत सर्व बाजूंनी पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई करताना दिसत आहे.

IndiavsPakistan: भारत - पाकिस्तानात वादग्रस्त वातावरण, 16 मे पासून महागणार 'या' गोष्टी
India Pakistan
| Updated on: May 09, 2025 | 10:32 AM
Share

IndiavsPakistan: भारत सर्व बाजूंनी पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई करताना दिसत आहे. भारत – पाकिस्तानमध्ये तणावग्रस्त वातावरण असताना एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अदानी एअरपोर्ट्सद्वारे व्यवस्थापित छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) येथून उड्डाण करणं 16 मे पासून महागणार आहे. एयरपोर्ट्स इकोनॉमिक रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने डॉमेस्टिक आणि इंटरनेशनल या दोन्ही उड्डाणांसाठी यूजर डेवलपमेंट फीस (UDF) मध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलीआहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 16 मे 2025 ते 31 मार्च 2029 या चार वर्षांसाठी ऑर्डर जारी करण्यात आले आहे. आतापर्यंत डॉमस्टिक प्रवासी यूडीएफ देत नव्हते. पण 16 मे पासून डिपार्चर आणि अरायवल दोघांसाठी यूडीएफ आकारण्यात येणार आहे. 16 मे पासून मुंबई विमानतळावरून प्रवास करणं किती महाग होईल जाणून घेऊ…

देशांतर्गत प्रवाशांना विमानतळावरून निघताना 175 रुपये आणि सीएसएमआयए येथे आगमन झाल्यावर 75 रुपये यूडीएफ द्यावं लागणार आहे. विमानतळाने यापूर्वी डिपार्चरसाठी 325 रुपयांचा यूडीएफ प्रस्तावित केला होता. तथापि, मंजूर झालेला यूडीएफ प्रस्तावापेक्षा सुमारे 50 टक्के कमी आहे.

हे सुद्धा वाचा – पूर्वी पाण्याच्या एका थेंबासाठी आता एक – एक रुपयांसाठी तरसणार पाकिस्तान, भारताने लढवलेल्या युक्तीनंतर शत्रू राष्ट्र होणार कंगाल?

आंतरराष्ट्रीय बिझनेस क्लास प्रवाशांसाठी आणि आंतरराष्ट्रीय इकॉनॉमी क्लास प्रवाशांसाठी वेगवेगळे UDF आकारण्यासाठी परिवर्तनशील दर योजना असण्याच्या CSMIA च्या प्रस्तावाला ERA ने मान्यता दिली आहे. आंतरराष्ट्रीय बिझनेस क्लास प्रवाशांना 695 आणि आंतरराष्ट्रीय इकॉनॉमी क्लास प्रवाशांना 615 रुपये यूजर डेव्हलपमेंट चार्ज भरावं लगणार आहे. आंतरराष्ट्रीय बिझनेस क्लासच्या प्रवाशांना उतरण्यासाठी 304 रुपये UDF आणि इकॉनॉमी क्लासच्या प्रवाशांना 260 रुपये द्यावे लागणार असल्याची माहिती मिळत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय (CSMI) विमानतळ हे अदानी समूहाच्या नेतृत्वाखालील मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (MIAL) द्वारे चालवलं जातं. हे विमानतळ दरवर्षी 35 लाख किंवा त्याहून अधिक प्रवाशांना सेवा देतं. हे प्रमुख विमानतळांच्या श्रेणीत येतं.

देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....