AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IndiavsPakistan: तरसणार पाकिस्तान… भारताने लढवलेल्या ‘या’ युक्तीनंतर शत्रू राष्ट्र होणार कंगाल?

IndiavsPakistan: पूर्वी पाण्याच्या एका थेंबासाठी आता एक - एक रुपयांसाठी तरसणार पाकिस्तान, भारताने लढवलेल्या युक्तीनंतर शत्रू राष्ट्र होणार कंगाल?

IndiavsPakistan: तरसणार पाकिस्तान... भारताने लढवलेल्या 'या' युक्तीनंतर शत्रू राष्ट्र होणार कंगाल?
India vs Pakistan
| Updated on: May 09, 2025 | 8:24 AM
Share

IndiavsPakistan: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावग्रस्त वातावरण आहे. युद्धभूमी असो किंवा राजनैतिकतेचे व्यासपीठ, भारत सर्व बाजूंनी पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई करताना दिसत आहे. असं असताना भारताने FATF (Financial Action Task Force) कडे मोठी मागणी केली आहे. पारिस्तानला ग्रे लिस्टमध्ये सामिर करुन घ्या अशी मागणी भारताकडून करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा वापर पाकिस्तान दहशतवादी कारवायांना चालना देण्यासाठी करत असल्याचा उल्लेख भारताने केला आहे.

भारत FATF च्या ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तानला सामिल करुन घेण्याची मागणी करत आहे. आंतरराष्ट्रीय मदत आणि बहुपक्षीय संस्थांकडून मिळणारी आर्थिक मदत दहशतवादी कारवायांना वित्तपुरवठा करण्यासाठी गैरवापर केली जात आहे.. असं कारण भारताने सांगितलं आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी जागतिक समुदायासमोर अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा उल्लेख केला आहे. ज्यात पाकिस्तानमध्ये फोफावणारे दहशतवादी सामील आहेत. जसे की मॉस्को थिएटर बॉम्बस्फोट आणि लंडन ब्रिज हल्ला. या दोन्ही हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी दहशतवादी सहभागी होते.

FATF ने पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून हटवलं होतं…

सांगायचं झालं तर, FATA एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. जी मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी वित्तपुरवठा यासारख्या निकषांवर आधारित देशांवर लक्ष ठेवतं. या क्षेत्रांमध्ये सुधारणा दाखवल्यानंतर पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून काढून हटवलं होतं. पण, उच्चपदस्थ सूत्रांनुसार, भारताच्या महसूल विभागाने आता नवीन चिंता आणि गैरवापराच्या पद्धतीचं कारण देत पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट करण्यासाठी तोंडी एक नवीन केस सादर केली आहे.

एवढंच नाही तर, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या एका महत्त्वाच्या बैठकीपूर्वी, भारताने असे संकेत दिले आहेत की ते IMF ने पाकिस्तानला दिलेल्या मदत पॅकेजला विरोध करेल आणि जागतिक संघटनेला आपले मत कळवू शकेल. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्यानुसार, शुक्रवारी होणाऱ्या बोर्ड बैठकीत आयएमएफमधील भारताचे कार्यकारी संचालक देशाची बाजू मांडतील.

सांगायचं झालं तर, भारतीय सैन्य युद्धभूमीवर पाकिस्तानविरुद्ध अनेक मोठ्या कारवाया करताना दिसत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या हलचाली पाहिल्यानंतर भारताने देखील अनेक हल्ले केले आहेत. भारतीय सैन्याने लाहोर, रावळपिंडी, कराची, सियालकोट आणि इस्लामाबादवर हल्ला केला आहे. भारताने ही प्रत्युत्तराची कारवाई केली आहे. कारण पाकिस्तानने भारतातील निवासी भागांवर हल्ले सुरू केले होते.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.