AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भारताचा मास्टस्ट्रोक, समुद्रात मोठा खेळ, आता होर्मूजमध्ये पाठवणार रिकामे टँकर, कारण काय?

सध्या इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर आता भारतानं मोठा निर्णय घेतला असून, मोठी बातमी समोर येत आहे.

मोठी बातमी! भारताचा मास्टस्ट्रोक, समुद्रात मोठा खेळ, आता होर्मूजमध्ये पाठवणार रिकामे टँकर, कारण काय?
Strait of HormuzImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 30, 2026 | 9:05 PM
Share

युद्धामुळे मध्य पूर्वेत चांगलाच तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यामुळे जगातील अनेक बड्या देशांवर सध्या इंधनाचं संकट निर्माण झालं आहे. इंधन टंचाईचा भारताला देखील मोठा फटका बसला आहे. दरम्यान देशातील ऊर्जा संकट दूर करण्यासाठी आता भारतानं मोठा निर्णय घेतला आहे. भारतानं मोठं पाऊल उचललं आहे. सरकार आता मध्य पूर्वेत तेलाचे रिकामे टँकर पाठवणार आहे. मध्य पूर्वेत रिकामे टँकर पाठवून त्यातून कच्च तेल आणि गॅस भरून आणण्याची योजना सरकारने तयार केली आहे. भारताचं परराष्ट्र मंत्रालय, भारतीय नौदल आणि शिपिंग मंत्रालय यांच्या सयुक्त विद्यमाने हे ऑपरेशन राबवण्यात येणार आहे. आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये देशावर ऊर्जा संकट निर्माण होऊ नये, यासाठी आता भारतानं हा निर्णय घेतला आहे.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने आपल्या शत्रू राष्ट्रांसाठी होर्मूजची सामुद्रधुनी बंद केली आहे. मित्र राष्ट्रांच्या जहाजांना या मार्गाने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र जरी परवानगी देण्यात आली असली तरी देखील हा मार्ग युद्धमुळे अतिशय संवेदनशील बनल्यामुळे या मार्गाने युद्धापूर्वी जेवढी वाहतूक सुरू होती, तेवढी वाहतूक सध्या होताना दिसत नाही. युद्धामुळे या मार्गावर भारताचे 24 जहाजं अडकले होते, त्यातील 4 जहाजं भारतामध्ये परतले आहेत, मात्र अजूनही 20 जहाजं अडकून पडले आहेत, ज्या जहाजांवर 600 पेक्षा जास्त भारतीय नाविक आहेत. सरकार सातत्याने इराण आणि इतर देशांच्या संपर्कात आहे. जे जहाज होमूर्ज सामुद्रधुनीमध्ये अडकून पडले आहेत, त्या जहाजांना लवकरात लवकर सुरक्षितरित्या भारतात आणण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे.

भारतीय नौदलाने ओमानच्या खाडीमध्ये अनेक युद्धनौका तैनात केल्या आहेत. या युद्धनौका भारतीय कच्च्या तेलांच्या जहाजांना सुरक्षा पुरवत आहेत. या नौकांनी थेट होर्मूजच्या सामुद्रधुनीमध्ये प्रवेश केलेला नाहीये. मात्र जेव्हा भारतीय जहाजं तेल आणि गॅस घेऊन युद्धप्रवण क्षेत्रातून बाहेर पडत आहेत, तेव्हा त्या जहाजांना या युद्धनौका सुरक्षा पुरवण्याचं काम करत आहेत. दरम्यान दुसरीकडे आता इराणे चिंता आणखी वाढवली आहे, कारण जो जहाजांचा पारंपरिक रस्ता आहे, त्याने न जाता इराणच्या समुद्र किनाऱ्यांनी जहाजं न्यावेत असं सर्वच देशांना इराणकडून सांगण्यात आलं आहे, त्यामुळे धोका वाढला आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात