शत्रूच्या जमिनीच्या इंच, इंच भागावर असणार नजर, ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने उचलले हे पाऊल
मॅक्सार टेक्नॉलॉजी जगातील सर्वात उच्च-तंत्रज्ञान उपग्रह प्रणाली चालवते. त्यांचे उपग्रह 30 सेंटीमीटर पर्यंतच्या उच्च-रिझोल्यूशन प्रतिमा घेऊ शकतात. ज्यामुळे पायाभूत सुविधा, शस्त्रास्त्र प्रणाली आणि अगदी लष्करी वाहने देखील स्पष्टपणे ओळखणे शक्य होणार आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने आपली सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी पावले उचलली आहे. भारतीय सैन्याची क्षमता वाढवली जात आहे. सैन्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करुन दिले जात आहे. शत्रूच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष्य ठेवण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने काही आंतरराष्ट्रीय उपग्रह कंपन्यांसोबत संपर्क केला आहे. त्यामुळे हाय रिजोल्यूशन सॅटेलाइट फोटो मिळून रिअल टाईम देखरेख अधिक प्रभावी करणार आहे.
पाकिस्तानला ते फोटो चीनकडून मिळाले…
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर दरम्यान चीनने पाकिस्तानला लाइव्ह सॅटेलाइट इनपुट दिल्याचे संकेत मिळाले होते. भारत आणि पाकिस्तान दरम्यान डीजीएमओ पातळीवर चर्चा सुरु असताना पाकिस्तानने भारतातील काही खास ठिकाणांचे फोटो दाखवले होते. हे फोटो पाकिस्तानला चीनकडून मिळाल्याचे दावा केला जात आहे.
कोणत्या कंपनीसोबत केला संपर्क
एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही कमर्शियल सॅटेलाइट कंपन्यांसोबत चर्चा करत आहोत. आम्हाला आमच्या देखरेखीच्या क्षमता आणखी मजबूत कराव्या लागतील. युद्धजन्य परिस्थितीत रिअल-टाइम इंटेलिजन्सद्वारे चांगल्या लष्करी कारवाईसाठी खात्री करणे आहे. भारत ज्या कंपन्यांशी संपर्कात आहे. त्यात अमेरिकेतील मॅक्सार टेक्नॉलॉजीचा समावेश आहे.
मॅक्सार टेक्नॉलॉजी जगातील सर्वात उच्च-तंत्रज्ञान उपग्रह प्रणाली चालवते. त्यांचे उपग्रह 30 सेंटीमीटर पर्यंतच्या उच्च-रिझोल्यूशन प्रतिमा घेऊ शकतात. ज्यामुळे पायाभूत सुविधा, शस्त्रास्त्र प्रणाली आणि अगदी लष्करी वाहने देखील स्पष्टपणे ओळखणे शक्य होणार आहे. मॅक्सारच्या प्रवक्त्याने यावर भाष्य करण्यास नकार देत म्हटले की, ‘आम्ही कराराच्या वाटाघाटींवर भाष्य करत नाही.’
आतापर्यंत Cartosat आणि RISAT सारखे भारतीय उपग्रह शत्रूच्या हलाचालीवर लक्ष्य ठेवत आहेत. या उपग्रहाच्या माध्यमातून सैन्य रणनीती करण्यासाठी भूमिका पार पडली आहे. कार्टोसॅट-3 ची ओरिजनल रिजोल्यूशनजवळपास 50 सेंटीमीटरपर्यंत आहे.
भारत 52 सॅटेलाइट तैनात करणार
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने SBS-III (Space Based Surveillance) कार्यक्रम अंतर्गत 52 नवीन सॅटेलाइट तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात जमीन आणि समुद्र दोन्ही सिमांवर देखरेख करणारे उपग्रह असणार आहे.
