WDMMA Ranking : इंडियन एअरफोर्स जगातील तिसरं शक्तीशाली हवाई दल ठरताच चीनचा नुसता जळफळाट,कमी पण दाखवण्यासाठी म्हटलं की…
WDMMA Ranking : वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉर्डन मिलिट्री एअरक्राफ्टची (WDMMA) नुकतीच रँकिंग जाहीर झाली. यात इंडियन एअर फोर्सने चिनी हवाई दलावर मात केली. इंडियन एअर फोर्सने जगातील बेस्ट एअरफोर्समध्ये तिसरं स्थान मिळवलं. त्यामुळे चीनचा जळफळाट झाला आहे.

Indian Air Force Ranking : सैन्य क्षमतेचा विषय निघाल्यानंतर आपल्या डोक्यात नेहमी पाकिस्तान असतो. आपण पाकिस्तानपेक्षा किती पुढे आहोत किंवा मागे? अहो, पण एक आनंदाची बातमी आहे. भारताच्या हवाई दलाने चीनवर मात केली आहे. वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉर्डन मिलिट्री एअरक्राफ्टची (WDMMA) नुकतीच रँकिंग जाहीर झाली. त्यात इंडियन एअर फोर्स जगातील तिसरं शक्तीशाली हवाई दल ठरलं आहे. चीन भारताच्या मागे चौथ्या स्थानावर आहे. टॉप पोजिशनवर अजूनही अमेरिकेचा दबदबा कायम आहे. त्यानंतर दुसऱ्या नंबरवर रशियन एअरफोर्स आहे. चीनची घसरण चौथ्या स्थानावर झाली आहे. त्याआधी चीन तिसऱ्या नंबरवर होता. चौथ्या नंबरवर भारत होता. आता भारत चीनच्या पुढे निघून गेला आहे. ...
