India-Pakistan Tension : S-400 ने पाकिस्तानी मिसाइल्स, ड्रोन्स पाडली, मध्यरात्री भारतावर मोठ्या हल्ल्याचा प्रयत्न
India-Pakistan War : पाकिस्तानने आपली नीचता दाखवून दिली. काल रात्री भारतावर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या सर्तक असलेल्या सैन्यदलांनी त्यांचा प्रयत्न उधळून लावला. भारताने आज सकाळी अख्ख्या पाकिस्तानला हादरवून सोडलय.

भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला आहे. भारताने 7 मे च्या मध्यरात्री पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राइक केला. त्यात 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले. भारताने फक्त दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली होती. पण पाकिस्तानने आपली नीचता दाखवून दिली. काल रात्री भारतावर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या सर्तक असलेल्या सैन्यदलांनी त्यांचा प्रयत्न उधळून लावला. पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर भारताने पहिल्यांदाच आपल सुदर्शन चक्र S-400 वापरलं. एस-400 ही भारताची मजबूत एअर डिफेन्स सिस्टिम आहे. या सिस्टिमने पाकिस्तानकडून येणार मिसाइल्स, ड्रोन्स पाडले. पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठानकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, अदमपुर, बठिंडा, चंडीगढ़, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज सारख्या सैन्य ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व हल्ले भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने भेदून लावले.
भारताने पाकिस्तानात कुठले टार्गेट उडवले?
पाकिस्तानच्या अपयशी हल्ल्यानंतर भारताने गुरुवारी प्रत्युत्तर दिलं. भारताची कारवाई संतुलित असल्याच संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. भारताने फक्त त्याच ठिकाणांना टार्गेट केलय, जे काल रात्रीच्या हल्ल्यासाठी जबाबदार होते. पाकिस्तानने भारताच्या उत्तर आणि पश्चिम सैन्य ठिकाणांवर ड्रोन आणि मिसाइलद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केला. भारताने केलेल्या कारवाईत लाहोरची एअर डिफेन्सची सिस्टिम उद्धवस्त केली. पाकिस्तानने ही सिस्टिम चीनकडून खरेदी केली होती.
100 दहशतवादी मारले
भारताने बुधवारी मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर केलं. पाकिस्तान आणि पीओकेमध्ये घुसून त्यांचे 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले. लष्कर आणि जैश-ए-मोहम्मदचे तळ उडवून दिले. जैशचा प्रमुख मसूह अजहरच्या कुटुंबाचा खात्मा झाला आहे. त्याच्या कुटुंबातील 10 लोकांचा या कारवाईत मृत्यू झाला.
पाकिस्तानात कुठे-कुठे ड्रोन हल्ला?
पाकिस्तानच्या कराची, गुंजरावाला, लाहोर, चकवाल आणि घोटकी येथे ड्रोन अटॅक झालाय. ड्रोन अटॅकमुळे या भागात इमर्जन्सी सारखी स्थिती आहे. हे ड्रोन कुठून आले? या बद्दल पाकिस्तानने अजून काहीही सांगितलेलं नाही. कोणीही अजून या ड्रोन हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या पाच शहरांशिवाय उमरकोटमध्ये सुद्धा ड्रोन ब्लास्ट झाल्याची माहिती आहे. सर्वात जास्त 3 ड्रोन ब्लास्ट लाहोरमध्ये झाले आहे. पाकिस्तानी मीडियानुसार आतापर्यंत पाकिस्तानात एकूण 12 बॉम्बस्फोट झाले आहेत. लाहोरच्या सैन्य ठिकाणांजवळ हे ड्रोन बलास्ट झाले आहेत.