Jaguar Crash : कारगिल युद्धाच्या हिरोला आता रिटायर करण्याची वेळ आली का? 45 वर्षाच्या सेवेत 50 पेक्षा जास्त जखमा
Jaguar Crash : भारताने सुरुवातील जॅग्वारला शमशेर नावाने विकत घेतलेलं. या विमानांची निर्मिती हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL) लायसन्स तत्वावर केली होती. वर्तमानात एअर फोर्सच्या सहा स्क्वाड्रन्समध्ये जवळपास 115 ते 120 SEPECAT जॅग्वार विमानं आहेत.

राजस्थानच्या चुरुमध्ये बुधवारी जॅग्वार फायटर विमान कोसळलं. यात इंडियन एअर फोर्सच्या दोन फायटर पायलट्सचा मृत्यू झाला. या घटनेनंतर एअरफोर्सच्या या हिरोला टप्याटप्याने हटवण्याची वेळ आली आहे, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. या वर्षी मार्च महिन्यानंतर जॅग्वार फायटर जेटचा हा तिसरा अपघात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एअरफोर्सच्या 45 वर्षाच्या सेवाकाळात जॅग्वार ताफ्यातील विमानांना 50 छोट्या-मोठ्या दुर्घटनांचा सामना करावा लागलाय. यात काही अपघात जीवघेणे होते.
इंडियन एअर फोर्सला पहिलं जॅग्वार विमान 1979 साली मिळालं. 14 स्क्वाड्रन ही जॅग्वार ऑपरेट करणारी पहिली तुकडी होती. ‘बुल्स’ या नावाने ही स्क्वाड्रन ओळखली जायची. अंबाला येथे ही स्क्वाड्रन तैनात असायची. भारताने सुरुवातील जॅग्वारला शमशेर नावाने विकत घेतलेलं. या विमानांची निर्मिती हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL) लायसन्स तत्वावर केली होती. वर्तमानात एअर फोर्सच्या सहा स्क्वाड्रन्समध्ये जवळपास 115 ते 120 SEPECAT जॅग्वार विमानं आहेत.
कधीपर्यंत सर्व विमानं रिटायर होणार?
1999 साली कारगिल युद्धाच्यावेळी जॅग्वार फायटर जेट्सचा वापर करण्यात आला होता. थेट बॉम्बिंग ऑपरेशनसाठी हे विमान वापरलं नव्हतं. पण महत्त्वपूर्ण सहाय्यकाच्या भूमिकेत हे विमान वापरण्यात आलं. इंडियन एअरफोर्स 2027-28 पासून टप्याटप्याने जॅग्वार विमानं हटवण्याची प्रोसेस सुरु करु शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार 2035-2040 पर्यंत संपूर्णपणे या विमानांचा वापर थांबवण्याची योजना आहे.
कशामुळे हे अपघात झाले?
जॅग्वार विमान वापरताना आतापर्यंत 50 दुर्घटनांची नोंद झाली आहे. 2015 पासून 65 विमानं नष्ट झाली आहेत. प्रत्येक उड्डाण तासासाठी 20 तासाची देखभाल गरजेची असते. एक्सपर्टनुसार, जॅग्वार फायटर जेट्सशी संबंधित बहुतांश दुर्घटना या रोल्स रॉयस/टर्बोमेका एडोर एमके 804 आणि एमके 811 इंजिन मधल्या खराबीमुळे झाल्या आहेत.
रिपोर्टमध्ये काय म्हटलय?
एक रिपोर्टमध्ये रॉयल एअर फोर्सचे माजी प्रशिक्षक टिम डेविस यांनी म्हटलय की, इंजिन आणि एवियोनिक्स अपग्रेड केल्यानंतरही एअरफ्रेमला थकव्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. तुम्ही विमानाचा केवळ एक ठराविक हिस्साच बदलू शकता. एक पायलटचा मृत्यू हे सर्वात मोठ नुकसान असतं. विमान जितकं जुनं होतं, धोका तितका वाढतो.
कुठल्या देशांकडे ही विमानं होती?
ब्रिटेन, फ्रान्स, इक्वाडोर, नायजेरिया आणि ओमान या देशांच्या ताफ्यात जॅग्वार विमानं होती. पण त्यांना बऱ्याचआधी सेवानिवृत्त करण्यात आलय. त्यातील काही एअरफोर्स म्युझियममध्ये ठेवण्यात आली आहेत.
