AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्ध थांबलं, पण पाकिस्तानचं 86 तासात किती नुकसान किती झालं? भारतीय लष्कराने केला खुलासा

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील लष्करी तणाव संपला आहे. भारतीय सैन्याने पत्रकार परिषदेत दिली संपूर्ण कारवाईची माहिती.

युद्ध थांबलं, पण पाकिस्तानचं 86 तासात किती नुकसान किती झालं? भारतीय लष्कराने केला खुलासा
Pakistan lossImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 10, 2025 | 7:26 PM
Share

भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविरामाची घोषणा झाली आहे. या घोषणेनंतर भारतीय सैन्याने पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण कारवाईबाबत माहिती दिली. युद्धविरामाच्या घोषणेनंतर भारतीय सैन्याने सांगितले की, आम्ही पाकिस्तानला इतके मोठे नुकसान पोहोचवले की त्यांच्या हल्ल्याची क्षमता पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. भारतीय सैन्याने सांगितले की, आमच्या प्रत्युत्तर कारवाईत पाकिस्तानी सैन्याला प्रचंड नुकसान झाले आहे. पाकिस्तानच्या जमिनीवरील आणि हवाई तळांवर हल्ले करण्यात आले. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या स्कर्दू, जकोबाबाद, सरगोधा आणि भुलारी यासह हवाई तळांना मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवले. पाकिस्तानच्या हवाई संरक्षण आणि रडार प्रणाली पूर्णपणे नष्ट करण्यात आल्या.

भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, नियंत्रण रेषेजवळ (LoC) पाकिस्तानच्या कमांड कंट्रोल, लॉजिस्टिक, लष्करी पायाभूत सुविधा आणि त्याच्या जवानांना एवढे मोठे नुकसान पोहोचवण्यात आले की त्याची बचाव आणि हल्ल्याची क्षमता पूर्णपणे संपुष्टात आली. वाचा: तुर्कीला शस्त्रांपेक्षा कुत्र्यांची सर्वाधिक भीती, टेन्शन इतकं की बलाढ्य देशाने घेतला हा निर्णय…

कर्नल सोफिया कुरैशी यांनी पाकिस्तानच्या प्रत्येक खोट्याचा पर्दाफाश केला

सैन्याच्या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरैशी म्हणाल्या, “पाकिस्तानने दावा केला की त्यांच्या JF 17 विमानांनी आमच्या S400 आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्र तळांना नुकसान पोहोचवले, जो पूर्णपणे खोटा आहे. दुसरे, त्यांनी खोट्या माहितीचा प्रसार केला की सिरसा, जम्मू, पठाणकोट, भटिंडा, नलिया आणि भुज येथील आमच्या हवाई तळांना नुकसान झाले, हा दावाही पूर्णपणे खोटा आहे. तिसरे, पाकिस्तानच्या खोट्या माहिती मोहिमेनुसार, चंदीगड आणि व्यास येथील आमच्या दारूगोळा डेपोला नुकसान झाले, हेही पूर्णपणे खोटे आहे. पाकिस्तानने खोटे आरोप केले की भारतीय सैन्याने मशिदींना नुकसान पोहोचवले. मी स्पष्ट करू इच्छिते की भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे आणि आमचे सैन्य भारताच्या संवैधानिक मूल्यांचे एक सुंदर प्रतिबिंब आहे…”

कमोडोर रघु आर. नायर म्हणाले, “समुद्र, हवा आणि जमिनीवरील सर्व लष्करी कारवाया थांबवण्यासाठी सहमती झाली आहे. भारतीय सैन्य, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलांना या सहमतीचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत…”

भारताच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी सैन्य पूर्णपणे सज्ज: कर्नल सोफिया कुरैशी

विंग कमांडर व्योमिका सिंग म्हणाल्या, “आमची मोहीम विशेषतः भारतविरोधी कारवायांसाठी वापरल्या जाणाऱ्या दहशतवादी ठिकाणांवर लक्ष केंद्रित होती. भारतीय सशस्त्र दलांनी कोणत्याही धार्मिक स्थळाला लक्ष्य केले नाही…” कर्नल सोफिया कुरैशी म्हणाल्या, “भारतीय सशस्त्र दल पूर्णपणे सज्ज, सतर्क आणि भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या रक्षणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे.”

युद्धविरामानंतर सैन्याच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे

  • पाकिस्तानकडून खोटा आरोप केला जात आहे की भारतीय सैन्याने मशिदींना नुकसान पोहोचवले. मी सांगू इच्छिते की भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. मशिदींवर हल्ल्याची बाब पूर्णपणे खोटी आहे.
  • भारतीय सैन्याने पाकिस्तानला मोठे नुकसान पोहोचवले आहे. लष्करी तळांसह हवाई संरक्षण प्रणालीलाही प्रचंड नुकसान झाले आहे.
  • पाकिस्तानला इतके नुकसान झाले आहे की त्याची आक्रमक आणि बचावात्मक प्रणाली उद्ध्वस्त झाली आहे. कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितले की भारतीय सैन्य भारताच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी पूर्णपणे सज्ज आहे.
  • विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितले की पाकिस्तान जाणीवपूर्वक खोटा प्रचार करत आहे. आमच्या कारवाईत पाकिस्तानला प्रचंड नुकसान झाले आहे.
  • ब्रह्मोसला नुकसान पोहोचवल्याचा दावा खोटा आहे. S400 ला नुकसान झाल्याचा वादा खोटा आहे. भारताने मशिदींवर हल्ले केल्याची बाब खोटी आहे. श्रीनगर-भुजमधील सैन्य तळांना नुकसान झाल्याची बाब खोटी आहे.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.