AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणत्याही स्थितीला तोंड देण्यास सज्ज, भारतीय सैन्याला शक्तीशाली हत्यारं खरेदी करण्यासाठी 500 कोटी

चीनच्या सैन्यासोबत तणाव निर्माण झाल्यानंतर भारतीय सैन्याच्या धोरणात मोठे बदल होत असल्याचं दिसत आहे (Indian government permit Fund to Army for weapons).

कोणत्याही स्थितीला तोंड देण्यास सज्ज, भारतीय सैन्याला शक्तीशाली हत्यारं खरेदी करण्यासाठी 500 कोटी
| Updated on: Jun 22, 2020 | 2:24 PM
Share

नवी दिल्‍ली : पूर्व लडाखमध्ये चीनच्या सैन्यासोबत तणाव निर्माण झाल्यानंतर भारतीय सैन्याच्या निर्णय प्रक्रियेत आणि धोरणात मोठे बदल होत असल्याचं दिसत आहे (Indian government permit Fund to Army for weapons). केंद्र सरकारने तिन्ही दलांना शक्तीशाली हत्यारं खरेदी करण्यासाठी 500 कोटी रुपयांचा आपतकालिन निधी मंजूर केला आहे. यावरुन सरकारने तिन्ही दलांना चीनला सडेतोड उत्तर देण्यासाठी निर्णय घेण्याचे अधिकार दिल्याचं दिसत आहे. त्यामुळे लवकरच भारतीय सैन्याच्या जोडीला अनेक अद्ययावत शस्त्रांचा साठा आलेला पाहायला मिळणार आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ डिफेंस स्टाफ म्हणजेच सीडीएस बिपिन रावत, सैन्य दलाचे प्रमुख जनरल एम.एम. नरवाने, वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदोरिया आणि नौदल प्रमुख करमबीर सिंह यांच्यासोबत एक बैठक घेतली. यात चीनच्या कुरापतींना जशासतसे उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या अहवालात म्हटलं आहे, की संरक्षण मंत्र्यांनी भारतीय सैन्याला चीनच्या कुठल्याही कुरापतीला सडेतोड उत्तर देण्यासाठी तयार राहण्यास सांगितलं आहे.

चीनच्या आक्रमकतेला सडेतोड उत्तर देणार

पूर्व लडाखमध्ये चीनने आपल्या सैनिकांची संख्या वाढवली आहे. अशा स्थितीत चीनच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी भारताने देखील सैन्याला शक्तीशाली शस्त्रास्त्र खरेदीसाठी खुली सूट दिली आहे. यासाठी 500 कोटींची आर्थिक तरतूद देखील करण्यात आली. भारतीय सैन्याला अशाप्रकारे थेट निर्णय घेण्याची सूट देण्याची ही तशी पहिलीच वेळ नाही. याआधी देखील अशाच प्रकारे सैन्याला आर्थिक रसद पुरवण्यात आली होती. तेव्हा हवाई दलाने बालाकोट एअर स्‍ट्राईक केलं होतं.

“कमीत कमी वेळेत भारतीय सैन्य सज्ज असावं”

सरकारने कोणत्याही स्थितीत भारतीय सैन्य कमीत कमी वेळेत सज्ज असावं म्हणून ही सूट दिली आहे. बालाकोट एअर स्‍ट्राईकनंतर भारतीय हवाई दलाने सरकारच्या अशा सवलतीचा सर्वाधिक उपयोग करुन घेतला होता. त्यावेळी हवाई दलाने मोठ्या प्रमाणात शक्तीशाली शस्त्रास्त्र खरेदी केली. यात हवेतून जमिनीवर आणि हवेतून हवेत मारा करणाऱ्या (स्‍टँड ऑफ स्‍पाइस-2000 Spice-2000) क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. सैन्याने इस्त्राईलच्या स्पाईक अँटी टँक गायडेड मिसाईल देखील मिळवले आहेत. अमेरिकेकडून देखील मोठ्या प्रमाणात दारुगोळा खरेदी करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

India China Face Off | बिहार रेजिमेंटचे प्रमुख चिनी सैनिकांच्या तंबूत, सूर्यास्तावेळी धक्काबुक्की, आणि… 15 जूनच्या मध्यरात्री नेमकं काय काय झालं?

गलवान खोऱ्यात चिनी घुसखोरीवरुन काँग्रेसचे प्रश्न, पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्टीकरण

PM Narendra Modi | एक इंच जमीनवरही चीनचा कब्जा नाही, सैन्याला सर्व सूट, आमच्याकडेही Fighter Planes : मोदींनी ठणकावलं

Indian government permit Fund to Army for weapons

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.