AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vande Bharat Train | वंदे भारतच्या ट्रेनना पंतप्रधान नरेंद्र मोदीच हिरवा झेंडा का दाखवतात? यामागे कारण काय?

Vande Bharat Train | वंदे भारत ट्रेन्सना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हिरवा झेंडा का दाखवत नाहीत? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. त्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बरीच टीका होते. नरेंद्र मोदी सर्व क्रेडिट घेतात, असं म्हटलं जातं. पण मोदी उद्घाटन करतात, त्यामागे काय कारण आहे? ते जाणून घ्या.

Vande Bharat Train | वंदे भारतच्या ट्रेनना पंतप्रधान नरेंद्र मोदीच हिरवा झेंडा का दाखवतात? यामागे कारण काय?
vande bharat trains flagging off by pm narendra modi
| Updated on: Jun 29, 2023 | 3:47 PM
Share

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी भोपाळ येथून एकाच वेळी पाच वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक वंदे भारत ट्रेनचा शुभारंभ करतात. 2019 मध्ये वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात झाली. रेल्वे मंत्र्यांच्याऐवजी पंतप्रधानच प्रत्येक ठिकाणी हिरवा झेंडा दाखवतात. अनेकांच्या मनात हा प्रश्न आहे असं का?

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हिरवा झेंडा का दाखवत नाहीत?. वंदे भारत एक्सप्रेस ही केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. विरोधी पक्ष पंतप्रधान मोदींवर क्रेडीट घेण्याचा आरोप करतो.

मोदीच उद्घाटन का करतात?

मोदीच उद्घाटन का करतात? या प्रश्नाच उत्तर असं असू शकत की, मोदी स्वत: पंतप्रधान आहेत. कुठल्या कार्यक्रमात सहभागी व्हायच ते स्वत: ठरवू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला प्राधान्य दिलं आहे. मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबा यांचं निधन झालं. मात्र, तरीही पंतप्रधान मोदींनी शेड्युलमध्ये बदल केला नाही. त्यांनी पश्चिम बंगालच्या हावडा-जलपायगुडीला जोडणाऱ्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

वंदे भारतचा वेग किती?

वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या माध्यमातून मतांच्या गणिताची जुळवाजुळव करणं हे सुद्धा कारण असू शकतं. वंदे भारत एक्सप्रेसचा सर्वाधिक वेग 160 किलोमीटर प्रतितास आहे. देशातील अन्य पॅसेंजर ट्रेनच्या तुलनेत वंदे भारतचा वेग 50 किमी जास्त आहे.

म्हणून रेल्वे मंत्र्यांऐवजी मोदी करतात उद्घाटन

वंदे भारत ट्रेनच्या मागे काही राजकीय विचार आहे का? हो निश्चित आहे. वंदे भारत देशात बनलेली ट्रेन आहे. या ट्रेनला राष्ट्रीय भावनेशी जोडलं जातं. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या ट्रेनच उद्घाटन केलं, तर कदाचित जास्त लोकांचा लक्ष जाणार नाही. पंतप्रधान मोदी जेव्हा सहभागी होतात, तेव्हा चर्चा होते. मोठा समूह याची दखल घेतो. देशातील रेल्वे विकास, आधुनिकीकरणाच्या मार्गावर असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असतो.

मोदींच लक्ष्य काय?

पुढच्यावर्षी एप्रिल-मे महिन्यात देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात असतील. पक्षाला बहुमत मिळवून देण्याचा त्यांचा इरादा असेल. मध्य प्रदेशमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. राजस्थानमध्ये सुद्धा यावर्षी विधानसभा निवडणूक आहे. 2024 पर्यंत किती वंदे भारत ट्रेन्स सुरु करणार?

2024 पर्यंत 75 वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याची सरकारची योजना आहे. पुढच्यावर्षी लोकसभा निवडणुकीआधी वंदे भारत एक्सप्रेसच स्लीपर क्लास मॉडेल आणण्याची योजना आहे. वंदे भारत एक्सप्रेसला सरकारच्या चांगल्या कामांशी जोडून राजकीय फायदा घेण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असेल.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.