AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील ऊर्जा संकट आता झटक्यात होणार दूर, पुढच्या काही तासांमध्ये मिळणार मोठी गुड न्यूज, अमेरिकेकडून थेट मोठी घोषणा

स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे भारतावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. आखाती देशांमधून होणारा कच्चं तेल आणि एलपीजी गॅसचा पुरवठा ठप्प झाला आहे. मात्र आता लवकरच भारतावरील हे संकट दूर होण्याची शक्यता आहे.

भारतातील ऊर्जा संकट आता झटक्यात होणार दूर, पुढच्या काही तासांमध्ये मिळणार मोठी गुड न्यूज, अमेरिकेकडून थेट मोठी घोषणा
Marco RubioImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 24, 2026 | 3:50 PM
Share

अमेरिका आणि इराणमध्ये अजूनही संघर्ष सुरूच आहे. इराणने अणु करार करावा यासाठी अमेरिकेकडून इराणवर दबाव निर्माण केला जात आहे. तसेच जर इराणने आता लवकरात लवकर अणु करार केला नाही तर आम्ही पुन्हा इराणवर हल्ला करू असा इशाराही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. दरम्यान इराणकडून पुन्हा एकदा अमेरिकेला युद्ध थांबवण्यसाठी नवा प्रस्ताव देण्यात आला होता, तो प्रस्तावर देखील अमेरिकेनं फेटाळून लावला आहे, आता अणु करार आणि पूर्ण युद्धविराम हे एकाचवेळी होईल अशी आमची भूमिका असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा दाखवण्यात आला होता, युनायटेड स्टेट इन मिडल इस्ट असं कॅप्शन या फोटोला ट्र्म्प यांनी दिलं होतं, या फोटोमुळे जगभरात मोठी खळबळ उडाली होती.

दरम्यान अमेरिका आणि इराणच्या संघर्षामुळे स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद आहे, त्यामुळे भारतासह जगातील अनेक देशांवर सध्या मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो हे सध्या भारत दौऱ्यावर असून त्यांनी दिल्लीतून मोठी घोषणा केली आहे. त्यांनी स्ट्रेट ऑफ होर्मूजबद्दल मोठी अपडेट दिली आहे. पुढील काही तासांमध्येच स्ट्रेट ऑफ होर्मूजबद्दल गुड न्यूज मिळेल असं मार्को रुबियो यांनी म्हटलं आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूज हा एक आंतरराष्ट्रीय मार्ग असून इराण त्यावर दावा करू शकत नाही, असंही यावेळी मार्को रुबियो यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले?

मार्को रुबियो यांनी दिल्लीमध्ये बोलताना मोठा दावा केला आहे, पुढील काही तासांमध्येच आता स्ट्रेट ऑफ होर्मूजमधून गुड न्यूज समोर येईल असा दावा त्यांनी केला आहे. आमचं इराणसोबत बोलणं सुरू आहे, गेल्या 48 तासांमध्ये चर्चा प्रगतीपथावर पोहोचली आहे, त्यामुळे लवकरच गुड न्यूज समोर येईल. स्ट्रेट ऑफ होर्मूज हा एक आंतरराष्ट्रीय मार्ग आहे, त्यामुळे या मार्गावर इराण दावा करू शकत नाही, असंही मार्को रुबियो यांनी म्हटलं आहे. दरम्यान इराणला कधीही अण्वस्त्राची निर्मिती करू न देणे हीच आमची प्राथमिकता असल्याचंही यावेळी रुबियो यांनी म्हटलं आहे.

Follow Us
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
Big Breaking | विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या राष्ट्रवादीत चाललंय तरी काय?
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना फोन केला अन्...
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
Aaditya Thackeray | दानपेटीची चोरी करणाऱ्यांसोबत जाणार का? भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना आदित्य ठाकरेंचा सवाल
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
Pune | पुण्यात आज भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर..
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात मुख्यमंत्र्यांसह...
आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली; पालखी मार्गावर..
Alandi | पालखी मार्गावर महिलेचा हायव्होल्टेज राडा! आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट, काय झाली चर्चा?
कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर शेतकऱ्यांचं झाडावर चढून आंदोल
Mumbai Farmer Protest | शेतकऱ्यांचा संताप शिगेला! कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर झाडावर चढून आंदोलन
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने