AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोळे वटारणाऱ्या नेपाळचं आता भारतानं असं नाक दाबलं श्वासच गुदमरला, बालेन शाह यांना सर्वात मोठा धक्का, देशात हाहाकार

गेल्या काही दिवसांपासून नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी भारताविरोधी निर्णय घेण्याचा धडका लावला आहे, मात्र त्यानंतर आता भारताने नेपाळला असं उत्तर दिलं आहे, ज्यामुळे बालेन शाहा यांना सर्वात मोठा झटका बसला आहे.

डोळे वटारणाऱ्या नेपाळचं आता भारतानं असं नाक दाबलं श्वासच गुदमरला, बालेन शाह यांना सर्वात मोठा धक्का, देशात हाहाकार
balen shahImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 26, 2026 | 5:17 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह हे सातत्याने भारताविरोधी निर्णय घेत आहेत, सुरुवातीला त्यांनी भारतामधून आयात होणाऱ्या वस्तूंवर कर लावण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर त्यांनी लिपूलेखवर देखील दावा सांगितला होता. तसेच या संदर्भात मध्यस्थी करावी असं पत्र देखील त्यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांना पाठवलं होतं. त्यानंतर त्यांनी भारतामधून नेपाळमध्ये येणाऱ्या वाहानांवर देखील टोला लावण्याचा निर्णय घेतला, तसेच या वाहनांना अस्थाई वाहने म्हणून नोंदणी करणं बंधकारक केलं होतं. ही प्रक्रिया अतिशय किचकट आणि गुंतागुंतीची आहे. दरम्यान त्यानंतर भारताकडून साखरेच्या रुपात नेपाळला पहिला दणका देण्यात आला, पुढील तीन वर्ष आता भारत नेपाळला कोणत्याही प्रकारे साखर निर्यात करणार नाहीये, त्यामुळे नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात साखरेची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. नेपाळसाठी भारताने दिलेला हा झटका ताजा असतानाच आता भारताने बालेन शाह यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे.

भारतासोबत नेपाळचा वाद वाढतच चालला आहे, याचदरम्यान आता नेपाळने पुन्हा एकदा आपले चहा निर्मितीचे चार कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भारतासोबत सुरू असलेल्या या वादाचा नेपाळला मोठा फटका बसला असून, नेपाळचा चहा उद्योग पूर्णपणे ठप्प झाला आहे. नेपाळने चहाचे कारखाने तर सुरू केले आहेत, मात्र आता भारताच्या कडक नियमांमुळे दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधामध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. भारताच्या एफएसएसएआयने चहासाठी जोखीम-आधारित तपासणी प्रणाली लागू केली आहे, या नियमानुसार भारत जो चहा आयात करणार आहे, त्यातील वीस टक्के चहाचे नमुने रँडम पद्धतीने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवले जाणार आहेत, हा नियम तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे.

भारताच्या या नव्या नियमाचा नेपाळच्या चहा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. काठमांडू पोस्टच्या एका रिपोर्टनुसार भारताच्या नव्या नियमामुळे नेपाळमध्ये तयार होणारी चहा पावडर ही प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात येत असल्याने जवळपास 3 लाख किलो चहापावडर ही बॉर्डवर अडकून पडली आहे, तर सध्या स्थितीमध्ये नेपाळमध्ये दहा लाख किलो चहापावडर बनून तयार आहे, मात्र भारतातील आयात ठप्प झाल्याने आता या सर्व कारखानदारांनी पुन्हा एकदा आपले कारखाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी