Indian Missiles : पाकिस्तानसाठी भारताची ही 3 मिसाइल्सच पुरेशी, किती मिनिटात कुठलं शहर उद्धवस्त होईल, जाणून घ्या डिटेल्स
Indian Missiles : पाकिस्तानच्या तुलनेत भारताकडे बरीच वेगवेगळ्या प्रकारची मिसाइल्स आहेत. भारत क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात पाकिस्तानच्या बराच पुढे आहे. फार नाही, आम्ही भारताच्या फक्त तीन मिसाइल्सबद्दल सांगणार आहोत, पाकिस्तानच्या लाहोर, कराची आणि इस्लामाबाद शहराला किती मिनिटात ही मिसाइल्स उद्धवस्त करतील ते जाणून घ्या.

पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करुन पाकिस्तानने भारताला थेट आव्हान दिलं आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी 26 निरपराध भारतीय पर्यटकांची हत्या केली. त्यामुळे सगळा देश खवळला आहे. काहीही करुन पाकिस्तानला धडा शिकवा, पाकिस्तानच्या नांग्या ठेचा हीच एकमुख मागणी सुरु आहे. भारताने लष्करी कारवाई करण्याआधी सुरुवातीला डिप्मोमॅटिक स्ट्राइक केला. त्यानेच पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. सिंधू जल करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तान गडबडला आहे, अस्वस्थ झाला आहे. पाकिस्तानकडून थेट युद्धाची भाषा सुरु झाली आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्यापासून ते पाकिस्तानचे रेल्वे मंत्री युद्धाची धमकी देत आहेत. आमच्याकडे अणूबॉम्ब आहे, त्याचा आम्ही वापर करु असे इशारे देत आहेत. पाकिस्तानने सीमेवर सैन्याची संख्या वाढवली आहे. भारताच्या जवळ असणाऱ्या एअर बेसेसवर पाकिस्तानी फायटर विमानांच्या हालचाली वाढल्या आहेत. पाकिस्तानच्या आकाशात फायटर विमानांचा सराव सुरु आहे. दुसऱ्याबाजूला भारत शांतपणे आपल्याला जे करायच आहे ते करतोय. पाकिस्तानकडून वारंवार युद्धाची भाषा, धमकी दिली जात असली, तरी पाकिस्तानला भारताच्या शक्ती पूर्ण कल्पना आहे. भारताची फक्त तीन मिसाइलच पाकिस्तानचा खेळ बिघडवण्यासाठी पुरेशी आहेत, त्यांच्याबद्दल जाणून घ्या.
ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइल
प्रकार: सुपरसॉनिक क्रूज मिसाइल
रेंज: 290-700 किमी
वजन: 3000 किलोग्रॅम (पारंपरिक आणि अणवस्त्र वाहून नेण्यास सक्षम)
लॉन्च प्लॅटफॉर्म: जमीन, समुद्र, हवा आणि पाणबुडी
विशेषता : रडारपासून बचाव करण्यासाठी 3-4 मीटर उंचीवरुन उड्डाण, उड्डाणवस्थेत दिशा बदलण्याची क्षमता
लाहोर : अमृतसरपासून लाहोर पर्यंतच अंतर फक्त 55 किलोमीटर आहे. ब्रह्मोसची गती लक्षात घेता हे क्षेपणास्त्र 72 सेकंदापेक्षा कमी वेळात लाहोर शहराला टार्गेट करु शकतं.
इस्लामाबाद : अमृतसर ते इस्लामाबाद हे अंतर 287 किमी आहे. ब्रह्मोस 5 मिनटात या शहरांपर्यंत धडकू शकतं.
कराची : भुज ते कराची हे अंतर 325 किमी आहे. कराची ब्रह्मोसच्या रेंजमध्ये सहज येतं. कराचीला टार्गेट करायला 5 ते 6 मिनिटं लागतील.
ब्रह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तपणे मिळून विकसित केलेलं जगातील वेगवान क्षेपणास्त्र आहे. याची सुपरसोनिक गती आणि अचूकता खासियत आहे. हे मिसाइल भारतीय सैन्य, नौदल आणि एअरफोर्समध्ये वापरात आहे. ब्रह्मोसच्या नव्या आवृत्तीत याची रेंज 1500 किलोमीटरपर्यंत वाढवता येऊ शकते.
शौर्य मिसाइल
प्रकार: क्वासी-बॅलिस्टिक मिसाइल (अणवस्त्र वाहून नेण्यास सक्षम)
रेंज: 700-1900 किमी
वजन: 6.2 टन
विशेषता : मोबाइल लॉन्च वाहनाने तैनाती, हायपरसोनिक गतीमुळे रडारला चकवा आणि अचूक वार
लाहोर: शौर्य मिसाइल हाइपरसोनिक गतीमुळे लाहोर शहराला 20 ते 30 सेकंदात टार्गेट करु शकते.
इस्लामाबाद : याची रेंज 1900 किमीपर्यंत आहे. इस्लामाबादपर्यंत हे मिसाइल 3 ते 4 मिनिटात पोहोचेल.
कराची: कराचीला टार्गेट करायला चार ते पाच मिनिट लागतील.
शौर्य एक सामरिक मिसाइल आहे. युद्धाच्या मैदानात तात्काळ तैनातीसाठी हे मिसाइल डिझाइन करण्यात आलं आहे. याची हाइपरसॉनिक गती आणि मोबाइल लॉन्चरमुळे PAK च्या एअर डिफेन्ससाठी हे मिसाइल धोकादायक आहे.

प्रलय बॅलेस्टिक मिसाइल
प्रकार : सामरिक शॉर्ट-रेंज बॅलेस्टिक मिसाइल
रेंज : 150-500 किमी
गती : मॅक 5 पेक्षा अधिक (हायपरसोनिक श्रेणी )
विशेषता : मल्टीपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हीकल्स (MIRV), मोबाइल लॉन्चर आणि रडारपासून वाचण्याची क्षमता.
लाहोर : प्रलय मिसाइल लाहोरला 30-40 सेकंदात टार्गेट करु शकतं.
इस्लामाबाद : इस्लामाबादला नष्ट करायला 2-3 मिनिटं लागतील.
कराची : कराचीला टार्गेट करायला 3-4 मिनिटाचा वेळ लागेल.
प्रलय मिसाइल खासकरुन भारत-पाकिस्तान सीमा (LoC) आणि भारत-चीन सीमा (LAC) वर तैनातीसाठी विकसित करण्यात आलं आहे. हे मिसाइल आपली हायपरसॉनिक गती आणि MIRV टेक्निकमुळे एकाचवेळी अनेक लक्ष्यांना टार्गेट करु शकतं. पाकिस्तानसाठी हा मोठा धोका आहे.
