AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर अवघ्या एका मिनिटात 161 प्रेतांचा खच पडला असता… विमानाचं एमर्जन्सी लँडिंग; एअरपोर्टवर नेमकं काय घडलं?

पुन्हा एकदा विमान अपघात होता होता वाचला आहे. 161 प्रवासी असलेल्या विमानाच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

तर अवघ्या एका मिनिटात 161 प्रेतांचा खच पडला असता... विमानाचं एमर्जन्सी लँडिंग; एअरपोर्टवर नेमकं काय घडलं?
flightImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 28, 2026 | 2:53 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून विमान अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सतत विमानात बिघाड होणे, एमर्जन्सी लँडिग अशा अनेक गोष्टी आपण ऐकत असतो. शनिवारी सकाळी देखील अशीच एक धक्कादायक घटना कानावर आली आहे. एका विमानाचे एमर्जन्सी लँडिग करण्यात आले. वैमानिकाच्या कुशलतेमुळे 161 प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला आहे. आता नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

नेमकं काय घडलं?

शनिवारी सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर एका इंडिगो विमानात इंजिन फेल होण्याची शंक्यता निर्माण झाली. त्यामुळे विमानाचे फुल इमरजेंसी लँडिग करण्यात आले होते. मात्र, वैमानिकाच्या कुशलतेमुळे आणि विमानतळ प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठा अपघात टळला. विशाखापट्टणमहून दिल्लीकडे येत असलेल्या इंडिगो फ्लाइट ६E ५७९ मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळताच सकाळी १०:३९ वाजता रनवे २८ वर फुल इमरजेंसी घोषित करण्यात आली. विमानात एकूण १६० ते १६१ प्रवासी सवार होते.

सुरक्षित लँडिंग

विमानाने सकाळी सुमारे १०:५४ ते १०:५९ दरम्यान रनवे २८ वर सुरक्षित लँडिंग केले. लँडिंगच्या वेळी रनवेवर अग्निशमन वाहने आणि अँम्बुलन्स तैनात करण्यात आल्या होत्या. सर्व प्रवाशांना विमानातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रारंभिक माहितीनुसार, विमान मिड-एअरमध्ये इंजिन फेल होण्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. दिल्ली पोलिस आणि विमानतळ अधिकाऱ्यांनी तातडीने आपत्कालीन प्रोटोकॉल सक्रिय केले. इंडिगो कंपनीची तांत्रिक टीम सध्या विमानाची सखोल तपासणी करत आहे.

ही घटना अलीकडेच संसदेच्या स्थायी समितीच्या अहवालानंतर समोर आली आहे. त्या अहवालात भारतीय विमानांच्या तांत्रिक देखभालीबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली होती. अहवालानुसार, तपासलेल्या अनेक विमानांमध्ये सातत्याने तांत्रिक दोष आढळले होते. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. इंडिगो कंपनी या बिघाडाच्या नेमक्या कारणांचा तपास करत आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात