दूधात पाणी घातलं अन्… 10 वर्षांनी झालेल्या नवसाच्या मुलाचं 5 व्या महिन्यात मृत्यू… मातांनो बाळाला दूध देताना अशी चूक…
दूधात पाणी घातलं अन्... ,10 वर्षांनी झालेल्या नवसाच्या मुलाचं 5 व्या महिन्यात मृत्यू... मातांनो बाळाला दूध देताना अशी चूक करताय? बेतेल बाळाच्या जीवावर... घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे...

कधी काय होईल सांगता येत नाही… मातेने 10 वर्श अनेक नवस केले आणि तब्बल 10 वर्षांनंतर मुलाला जन्म दिला… पण त्या मुलाचं आयुष्य फक्त 5 महिन्यांचं होतं… 5 महिन्यांच्या मुलाचं निधन झाल्यामुळे आई – वडिलांना मोठा धक्का बसला आहे.. बाळाला दूध पाजताना एक चूक आई – वडिलांना महागात पडली आहे. आपल्या बाळाला दूध पचणार नाही याच विचारात आईने दुधात पाणी मिक्स केलं आणि बाळाला पाजलं. पण नळाला येणारं पाणी दुषित आहे हे आईला माहिती नव्हतं… हेच दूध बाळाच्या जीवावर बेतलं आहे… दुषित पाण्यामुळे जीव गमावलेल्या 5 महिन्याच्या बाळाचं नाव अव्यान असं होतं… तर ही धक्कादायक घटना इंदूर या स्वच्छ शहरातील भागीरथपुरा याठिकाणी घडली आहे.
भागीरथपुरा येथे राहणाऱ्या सुनील साहू यांनी सांगितल्यानुसार, 4 महिन्यांचा मुलगा अव्यान याला काही दिवसांपूर्वी उलट्या आणि जुलाबाची लक्षणं दिसली आणि त्याला बालरोगतज्ञांकडे नेण्यात आलं. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, घरातच औषधं सुरु करण्यात आली…
मृत बाळाच्या वडिलांनी सांगितल्यानुसार, ‘आम्ही बाजारातून दूध आणलं आणि बाळाला द्यायला सुरुवात केली. पण दूध घट्ट असल्यामुळे महापालिकेच्या नळ कनेक्शनमधून येणाऱ्या पाण्यात दूध मिसळून बाळाला देत होतो… त्याच दुषित पाण्यामुळे बाळाला उल्टी आणि जुलाब होऊ लागले आणि 29 डिसेंबर रोजी बाळाचं निधन झालं.’ या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितल्या नुसार, गेल्या एका आठवड्यात, भागीरथपुरामध्ये 1 हजार 100 हून अधिक लोकांना उलट्या आणि अतिसाराच्या आजाराने कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ग्रासलं आहे, त्यापैकी सुमारे 150 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक तपासात असं दिसून आलं की, गळतीमुळे नाल्यातील घाणेरडे पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमध्ये मिसळलं, ज्यामुळे भागीरथपुरामध्ये हा आजार पसरला.
शहरातील दुषित पाण्यामुळे आतापर्यंत जवळपास 7 जणांनी प्राण गमावले आहेत. इंदूरचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांनी आतापर्यंत सात जणांच्या मृत्यूची माहिती दिला आहे. तर स्थानिकांचा दावा आहे की, भागीरथपुरा परिसरात दूषित पाणी पिऊन आजारी पडल्यानंतर एका आठवड्यात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सहा महिन्यांचंबाळ आणि सहा महिलांचा समावेश आहे.
