AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

S अक्षराने नावाची सुरूवात होणाऱ्या लोकांचे नवीन वर्षात नशीब चमकणार, पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये थेट…

नवीन वर्षाला सुरूवात झाली असून जोरदार स्वागत केले जात आहे. मोठा उत्साह लोकांमध्ये बघायला मिळाला. आता नवीन वर्ष S नावाने सुरूवात होणाऱ्या व्यक्तींसाठी सोन्याहून पिवळे असणार आहे. सुगीचे दिवस त्यांच्या आयुष्यात येतील.

S अक्षराने नावाची सुरूवात होणाऱ्या लोकांचे नवीन वर्षात नशीब चमकणार, पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये थेट...
S Rashifal
| Updated on: Jan 01, 2026 | 12:18 PM
Share

2025 ला बाय बाय करून सर्वांनी 2026 चे स्वागत केले. लोकांमध्ये प्रचंड मोठा उत्साह या नवीन वर्षाबद्दल बघायला मिळतोय. नवीन वर्ष आनंदी, सुखकर जावे ही जवळपास सर्वांचीच इच्छा असते. विशेष म्हणजे हे 2026 S नावाच्या लोकांसाठी अत्यंत खास असणार आहे. S नावाने ज्या लोकांच्या नावाची सुरूवात होते, त्यांच्या आयुष्यात प्रेम, आनंद, पैसा आणि करिअरमध्ये चांगले दिवस येतील. जन्मपत्रिका, जन्माची वेळ आणि कुंडलीतून भविष्य बघितले जाते. पण नावाच्या सुरूवातीच्या अक्षरापासूनही भविष्य सांगता येते. ज्योतिष्यांच्या मते, ज्या लोकांच्या नावाची सुरूवात S पासून होते, त्यांच्यासाठी हे 2026 वर्ष अत्यंत आनंददायी ठरणार आहे. 2026 मध्ये, ज्या लोकांची नावे S अक्षराने सुरू होतात, त्यांच्यासाठी राहू पहिल्या स्थानात असेल.

जेव्हा राहू पहिल्या स्थानात असतो, तेव्हा तो चंद्रावर थेट प्रभाव येतो. यादरम्यानच्या काळात तुम्हाला काही करावे वाटते पण तुम्ही करावे की नाही म्हणून गोंधळात असाल. पण तुम्हाला घाबरण्याची अजिबातच गरज नाही. एखादा निर्णय घेताना ज्यावेळी तुम्ही गोंधळात असाल त्यातूनच तुम्ही योग्य निर्णय घ्याल. ज्यांची नावे ‘S’ अक्षराने सुरू होतात, त्यांच्यासाठी शनी दुसऱ्या स्थानात असेल. विशेष म्हणजे हे स्थान धन आणि कुटुंबातील स्थानासाठी अत्यंत महत्वाचे आहे. आर्थिक दृष्ट्या देखील या वर्षात तुम्ही खूप जास्त मजबूत व्हाल.

जर तुम्ही काही मोठा निर्णय घेत असाल तर नक्की घ्या. जसे की, संपत्ती किंवा एखादा मोठा बिझनेस तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. 2026 मध्ये तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होतील. तुम्हाला एका चांगले आयुष्य या वर्षात मिळेल. जर एखाद्या व्यक्तीसोबत तुमचा काही वाद वगैरे सुरू असेल तर समोरची व्यक्ती स्वत: तुमच्या पुढे येईल आणि चुका मान्य करेल.

विशेष म्हणजे जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तुमच्या लव्ह लाईफबद्दल काही महत्वाच्या घडामोडी घडतील. आरोग्याच्या समस्या आणि तुमचे दुश्मन दोन्ही यादरम्यान कमजोर होतील. मात्र, जून महिन्यात तुमचा खर्च अधिक वाढेल. शुभ कामात तुमचा पैसा लागेल. ज्यांची नावे ‘S’ अक्षराने सुरू होतात, त्यांच्यासाठी केतू सातव्या भावात असेल, जो विवाह आणि भागीदारीचे प्रतिनिधित्व करतो. हे विवाहित लोकांसाठी लागू आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

शिंदे सेनेला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का, 'स्थानिक' निवडणुकीत आव्हान
शिंदे सेनेला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का, 'स्थानिक' निवडणुकीत आव्हान.
तितकी मिर्ची बुरखेवाली महापौर बनेल याची का लागली नाही, राणेंचा प्रहार
तितकी मिर्ची बुरखेवाली महापौर बनेल याची का लागली नाही, राणेंचा प्रहार.
उल्हासनगरमध्ये महायुतीकडून सगेसोयरे रिंगणात 4 कुटुंबातील 12 जण मैदानात
उल्हासनगरमध्ये महायुतीकडून सगेसोयरे रिंगणात 4 कुटुंबातील 12 जण मैदानात.
पक्षाकडून उमेदवारी नाही म्हणून इच्छुक उमेदवाराचा जुगाड! मुंबईत चर्चा
पक्षाकडून उमेदवारी नाही म्हणून इच्छुक उमेदवाराचा जुगाड! मुंबईत चर्चा.
तो BJPचा बोलका पोपट...उत्तर भारतीय महापौर, या वक्तव्यावर राऊतांची टीका
तो BJPचा बोलका पोपट...उत्तर भारतीय महापौर, या वक्तव्यावर राऊतांची टीका.
असं न्यू इअर सेलिब्रेशन पाहिलंय? मुंबई लाईफ-लाईनकडून नव वर्षाचं स्वागत
असं न्यू इअर सेलिब्रेशन पाहिलंय? मुंबई लाईफ-लाईनकडून नव वर्षाचं स्वागत.
शेगाव गजानन महाराजांच्या मंदिरात नववर्षाच्या स्वागतासाठी भक्तांची रीघ
शेगाव गजानन महाराजांच्या मंदिरात नववर्षाच्या स्वागतासाठी भक्तांची रीघ.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी.
शिर्डी साईंच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात, भाविकांची मोठी गर्दी
शिर्डी साईंच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात, भाविकांची मोठी गर्दी.
युतीमुळे इच्छुकांचा हिरमोड, बंडोबांना थंड करण्यायुचं ठाकरेंपुढे चॅलेंज
युतीमुळे इच्छुकांचा हिरमोड, बंडोबांना थंड करण्यायुचं ठाकरेंपुढे चॅलेंज.